टोमॅटो शेती कशी?
टोमॅटो लागवडीपूर्वी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतामध्ये बेड केले, ठिबक सिंचन पाईप टाकला व त्यावर मल्चिंग पेपर वापरण्यात आला. त्यानंतर टोमॅटोची लागवड केली. मिश्र खत वापरले आणि 10-26-26 याचा देखील वापर केला. तसेच बुरशीनाशक, कीटकनाशकची फवारणी केली. या शेतीसाठी एकरी एक लाख रुपयांचा खर्च येतो त्यामुळे वीस गुंठे क्षेत्रासाठी 50 हजार रुपयांचा खर्च आला असल्याचे देखील गोरे यांनी सांगितले.
advertisement
इतर शेतकऱ्यांनी टोमॅटो शेती करावी का?
तरुण व इतर शेतकऱ्यांनी देखील टोमॅटो शेती नक्कीच करायला पाहिजे. मात्र या शेतीमध्ये खर्च देखील लागतो, त्यामध्ये टोमॅटो झाडे खाली पडू नये म्हणून बांबूंचा वापर करणे गरजेचे आहे. एक बांबू घ्यायचा झाल्यास वीस ते पंचवीस रुपयांना मिळतो तसेच त्यासाठी लागणारा तार हा 110 रुपये किलो दराने मिळतो. याबरोबरच मल्चिंगही घेतल्यानुसार वेगवेगळ्या भावात मिळते. ठिबक सिंचन पाईपलाही रक्कम अगोदर गुंतवणूक म्हणून करावी लागते, या टोमॅटो शेतीमध्ये नफा आहे मात्र तो बाजारभावावर अवलंबून असतो.





