Success Story : 20 गुंठ्यात केली शेती, उत्पन्न मिळालं 2 लाख, शेतकऱ्यानं असं काय केलं? Video
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
प्रगतशील शेतकरी किशोर गोरे यांनी टोमॅटो शेतीतून यंदाही यशस्वी वाटचाल केली आहे. 20 गुंठे क्षेत्रात वीरांग या वाणाची लागवड केली असून या क्षेत्रात सुमारे तीन हजार टोमॅटोची झाडे उभी आहेत.
छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील खिर्डी गावातील प्रगतशील शेतकरी किशोर गोरे यांनी टोमॅटो शेतीतून यंदाही यशस्वी वाटचाल केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटो उत्पादनाचा अनुभव असलेल्या गोरे यांनी ऑक्टोबर महिन्यात 20 गुंठे क्षेत्रात वीरांग या वाणाची लागवड केली असून या क्षेत्रात सुमारे तीन हजार टोमॅटोची झाडे उभी आहेत. योग्य नियोजन, वेळेवर खत-पाणी व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रणामुळे उत्पादन चांगले मिळत आहे. आतापर्यंत या शेतीतून त्यांना सव्वा एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच पुढील काही आठवड्यांत आणखी सुमारे 50 हजार रुपयांची भर पडेल, आणि एकूण दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली.
टोमॅटो शेती कशी?
टोमॅटो लागवडीपूर्वी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतामध्ये बेड केले, ठिबक सिंचन पाईप टाकला व त्यावर मल्चिंग पेपर वापरण्यात आला. त्यानंतर टोमॅटोची लागवड केली. मिश्र खत वापरले आणि 10-26-26 याचा देखील वापर केला. तसेच बुरशीनाशक, कीटकनाशकची फवारणी केली. या शेतीसाठी एकरी एक लाख रुपयांचा खर्च येतो त्यामुळे वीस गुंठे क्षेत्रासाठी 50 हजार रुपयांचा खर्च आला असल्याचे देखील गोरे यांनी सांगितले.
advertisement
इतर शेतकऱ्यांनी टोमॅटो शेती करावी का?
तरुण व इतर शेतकऱ्यांनी देखील टोमॅटो शेती नक्कीच करायला पाहिजे. मात्र या शेतीमध्ये खर्च देखील लागतो, त्यामध्ये टोमॅटो झाडे खाली पडू नये म्हणून बांबूंचा वापर करणे गरजेचे आहे. एक बांबू घ्यायचा झाल्यास वीस ते पंचवीस रुपयांना मिळतो तसेच त्यासाठी लागणारा तार हा 110 रुपये किलो दराने मिळतो. याबरोबरच मल्चिंगही घेतल्यानुसार वेगवेगळ्या भावात मिळते. ठिबक सिंचन पाईपलाही रक्कम अगोदर गुंतवणूक म्हणून करावी लागते, या टोमॅटो शेतीमध्ये नफा आहे मात्र तो बाजारभावावर अवलंबून असतो.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 7:01 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : 20 गुंठ्यात केली शेती, उत्पन्न मिळालं 2 लाख, शेतकऱ्यानं असं काय केलं? Video







