डेली अप-डाउसाठी हे 5 स्वस्त Electric Scooter बेस्ट! किंमत फक्त ₹89,999पासून सुरु
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Cheapest Electric Scooter in India: आज आम्ही तुमच्यासाठी भारती ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरची लिस्ट घेऊन आलो आहोत. ज्याची किंमत फक्त ₹89,999 पासून सुरु होते. लिस्टमध्ये Bajaj Chetak C25, Ola S1 X, TVS Orbiter, Ather Rizta X आणि Hero Vida VX2 नावाचा समावेश आहे.
advertisement
advertisement
Ola S1 X : Ola S1 X या लिस्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची (2 kWh बॅटरी) किंमत ₹82,999 ते ₹89,999 (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ते 95-108 किमी रेंज आणि सुमारे 85-90 km/h कमाल वेग देते. ओलाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे विस्तृत सेवा नेटवर्क, जलद चार्जिंग पर्याय आणि नेव्हिगेशन सारख्या अॅप-आधारित फीचर्सचा समावेश आहे. तसंच, लोक अनेकदा त्याच्या सर्व्हिसविषयी आणि बिल्ड क्वालिटीबद्दल तक्रार करतात.
advertisement
नुकतेच लाँच झालेले Chetak C25 हे कंपनीचे सर्वात परवडणारे मॉडेल आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत ₹91,399 आहे, परंतु पहिल्या 10,000 कस्टमर्ससाठी अर्ली-बर्ड डिस्काउंटसह, ती ₹87,100 मध्ये उपलब्ध आहे. 2.5 kWh बॅटरी 113 kmची रेंज आणि 55 km/h कमाल वेग देते. बजाज चेतकची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची मजबूत मेटल बॉडी, प्रीमियम बिल्ड क्वालिटी आणि उत्कृष्ट सर्व्हिस नेटवर्क आहे.
advertisement
Hero Vida VX2 : विडा वीएक्स 2 मध्ये बॅटरी-एज-ए-सर्व्हिस (BaaS) मॉडल आहे. ज्याचा बेस प्राइज खुप कमी आहे. VX2 Go व्हेरिएंट BaaS मध्ये ₹44,990 पासून सुरु होते. मात्र फूल प्राइज (बॅटरीसह)₹99,490 च्या आसपास आहे. VX2 Plus ची किंमत ₹94,800 पासून सुरु होते. रेंज 92-142 km पर्यंत आहे आणि टॉप स्पीड 70-80 km/h च्या आसपास क्लेम केली गेली आहे.
advertisement
TVS Orbiter : याच्या किंमती ₹99,900 पासून सुरू होतात आणि ₹1,04,900 (एक्स-शोरूम) पर्यंत जातात. 3.1 kWh बॅटरीसह, ते 158 kmची प्रभावी रेंज देते. TVS ची बिल्ड क्वालिटी, हँडलिंग आणि सर्व्हिस उत्कृष्ट आहेत. ते कुटुंबासाठी आदर्श आहे, जे लांब रेंज आणि आरामदायी राइड देते. तुम्ही विश्वासार्हतेपेक्षा रेंजला प्राधान्य दिले तर ऑर्बिटर हा सर्वोत्तम ऑप्शन असू शकतो.









