माघी गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील देवघर स्वच्छ करून गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठित करावी. दुर्वा, मोदक, फुले, तूपाचा दिवा आणि धूप अर्पण करून गणेश मंत्रांचा जप केल्यास मनाला शांती लाभते. यासोबतच, खाली दिलेल्या राशीनुसार उपाय केल्यास वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवता येतात.
मेष रास – या राशीच्या व्यक्तींनी गणपतीला लाल रंगाची फुले अर्पण करावीत. यामुळे आत्मविश्वास वाढून रखडलेली कामे मार्गी लागतात.
advertisement
वृषभ रास – दुर्वा अर्पण करून “ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा जप केल्यास आर्थिक स्थैर्य आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.
मिथुन रास – माघी जयंतीच्या दिवशी गणपती अथर्वशीर्ष पठण केल्यास बुद्धी तीव्र होते आणि निर्णयक्षमता सुधारते.
कर्क रास – पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य (मोदक किंवा पेढा) दाखवल्यास मानसिक शांतता आणि कौटुंबिक सौख्य वाढते.
सिंह रास – गणपतीला सिंदूर अर्पण करून तूपाचा दिवा लावल्यास मान-सन्मान, नेतृत्वगुण आणि करिअरमध्ये प्रगती होते.
कन्या रास – हिरव्या रंगाच्या वस्तू, विशेषतः दुर्वा अर्पण केल्यास आरोग्य सुधारते आणि कामातील अचूकता वाढते.
तूळ रास – गणपतीसमोर तूपाचा दिवा लावून काही वेळ ध्यान केल्यास नातेसंबंधात समतोल साधला जातो आणि आर्थिक निर्णय यशस्वी ठरतात.
वृश्चिक रास – लाल मोदकांचा नैवेद्य दाखवून संकटमोचन गणेश स्तोत्राचे पठण केल्यास अडचणी कमी होतात आणि धैर्य वाढते.
धनु रास – केळी किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण केल्यास शिक्षण, प्रवास आणि भाग्यवृद्धीला चालना मिळते.
मकर रास – काळ्या तीळाचा लाडू किंवा दुर्वा अर्पण केल्यास कामातील स्थिरता येते आणि जबाबदाऱ्या सहज पार पडतात.
कुंभ रास – निळी किंवा हिरवी फुले अर्पण करून सेवा-दान केल्यास नव्या संधी उपलब्ध होतात आणि सामाजिक मान्यता मिळते.
मीन रास – गूळ-नारळाचा नैवेद्य अर्पण करून मनोभावे प्रार्थना केल्यास अध्यात्मिक प्रगती होते आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.
(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
