मुंबई : वैदिक पंचांगानुसार आज सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास मानला जात आहे. आज ग्रहांची विशेष हालचाल आणि दुर्लभ योग निर्माण होत आहेत. यामुळे सर्व १२ राशींवर वेगवेगळे परिणाम दिसून येतील. शनिदेवांच्या कृपेने अनेक राशींना लाभ होणार असून काहींनी मात्र संयम आणि आत्मसंयम राखणे गरजेचे आहे. जाणून घ्या आजचे राशिभविष्य
advertisement
मेष : मेष राशीच्या लोकांना आज समोरच्या व्यक्तीचे अंतरंग समजून घेण्याची विशेष कला प्राप्त होईल. वैयक्तिक नातेसंबंध सुधारतील. व्यवसायात नवीन निर्णय फायद्याचे ठरतील.
वृषभ : वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज अचूक अंदाजाचा फायदा दैनंदिन जीवनात घ्यावा. वैवाहिक जीवनात समजून घेणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य लाभेल.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांच्या घरात आज आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह वाढेल. मित्रपरिवाराशी वेळ छान जाईल.
कर्क : कर्क राशीच्या लोकांचा आज जबाबदारी टाळण्याकडे कल राहू शकतो. स्त्रियांनी विशेषतः आरोग्याकडे लक्ष द्यावे. अर्धवट राहिलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
सिंह : सिंह राशीच्या लोकांमध्ये आज अंतर्गत संघर्ष वाढेल. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. व्यावसायिक क्षेत्रात संयम आणि दूरदृष्टीने निर्णय घ्या.
कन्या : कन्या राशीच्या लोकांपासून आज लोक दूर राहतील. मात्र, कामाच्या ठिकाणी तुमचे धाडस आणि आत्मविश्वास कौतुकास्पद ठरेल. महत्वाच्या गोष्टींमध्ये पुढाकार घ्याल.
तूळ : तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आज वाढेल. तुम्ही लोकांना आपलेसे करून घ्याल. प्रगतीचा वेग वाढेल आणि नवी संधी मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना आज धंद्यात अतिरिक्त भांडवलाची गरज भासेल. मात्र, पूर्वी घेतलेले कष्ट आता फळाला येतील. भागीदारीत लाभ संभवतो.
धनु : धनु राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक फायदा होईल. विशेषतः ज्या लोकांचे प्रदेशभर व्यवहार चालतात त्यांना उत्पन्नवाढीची शक्यता आहे.
मकर : मकर राशीच्या लोकांनी जोडधंद्याच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. परिश्रमाचे फळ हळूहळू मिळेल.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांना आज बोलण्याच्या व्यवसायात फायदा होईल. वकिली, अध्यापन, पत्रकारिता आणि संवाद क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.
मीन : मीन राशीच्या लोकांनी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उत्तम नियोजनावर भर द्यावा. योग्य वेळी घेतलेले निर्णय दीर्घकालीन यश देणारे ठरतील.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)