मुंबई : जगात प्रत्येकालाच श्रीमंती हवी असते. कारण पैसा असेल तर जीवनातील अनेक इच्छा पूर्ण करता येतात, हे वास्तव आहे. मात्र, केवळ मेहनत करून संपत्ती मिळत नाही, तर त्यामागे नशिबाचाही मोठा वाटा असतो, असे अनेकांचे मत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 24 सप्टेंबरपासून काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात. या दिवशी ग्रहांच्या विशेष संयोगामुळे ‘महालक्ष्मी राजयोग’ तयार होणार आहे. या योगामुळे धनलाभ, कीर्ती, प्रगती आणि सुखसोयींची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ खास ठरणार आहे.
advertisement
महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव
ज्योतिषशास्त्र सांगते की, ग्रहांच्या संक्रमणामुळे वेळोवेळी शुभ आणि अशुभ परिणाम निर्माण होतात. आज 24 सप्टेंबरपासून चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल, जिथे मंगळ आधीच स्थिर आहे. चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग तयार होईल. या योगाचा लाभ काही निवडक राशींना होणार आहे. त्यांना अचानक धनलाभ होण्याची, अडकलेले काम सुटण्याची आणि करिअरमध्ये उंची गाठण्याची संधी मिळू शकते.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूपच लाभदायक ठरू शकतो. महालक्ष्मी राजयोगामुळे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेली रक्कम परत मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या बोलण्यातील आकर्षण आणि व्यक्तिमत्व लोकांवर प्रभाव टाकेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता असून काम करण्याची प्रेरणा वाढेल. वैयक्तिक जीवनात दीर्घकाळ टिकणारे नाते विवाहात परिवर्तित होऊ शकते.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आज 24 सप्टेंबरचा महालक्ष्मी राजयोग सौख्यवर्धक ठरणार आहे. या काळात तुम्ही वैभव आणि सुखसोयींचा आनंद घेऊ शकाल. व्यवसाय करणाऱ्यांना विरोधकांपासून दिलासा मिळेल आणि मानसिक शांती लाभेल. तरुणांना समाजात नवीन ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल. मोठा आर्थिक नफा होऊ शकतो. वैवाहिक आयुष्यातील बंध अधिक घट्ट होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा महालक्ष्मी राजयोग विशेष ठरणार आहे. कारण तो त्यांच्या नवव्या भावात तयार होत आहे, जो भाग्याचा घर मानला जातो. या काळात नशिबाची साथ मिळेल. धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा नवे प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. संधींचा योग्य फायदा घेऊन तुम्ही यशस्वी ठराल.
दरम्यान, 24 सप्टेंबरला तयार होणारा महालक्ष्मी राजयोग या तीन राशींसाठी विशेष फलदायी ठरू शकतो. आर्थिक भरभराटीसोबतच मान-सन्मान, कुटुंबातील आनंद आणि व्यावसायिक प्रगती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार योगांचा परिणाम प्रत्येकावर वेगवेगळा होतो. त्यामुळे मेहनतीसोबत सकारात्मक विचार ठेवणे आणि संधींचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)