मुंबई : सप्टेंबर 2025 महिना हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला गेला. या महिन्यात अनेक ग्रहांनी आपली स्थिती बदलल्यामुळे सर्व राशींवर परिणाम झाला. आता सप्टेंबरचा शेवट होत असून, ऑक्टोबर 2025 चा आरंभ होणार आहे. ऑक्टोबर हा महिना केवळ सणांच्या दृष्टीनेच नाही तर ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीमुळेही विशेष ठरणार आहे. या काळात बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ यांसारखे महत्त्वाचे ग्रह राशी बदलतील. त्यामुळे मानवी जीवनात अनेक बदल दिसून येतील. काही राशींना या बदलांचा सकारात्मक फायदा होईल, तर काहींना आव्हानेही सामोरे जावे लागतील.
advertisement
ऑक्टोबरमध्ये ग्रहांचे बदल
ज्योतिषशास्त्रानुसार, 3 ऑक्टोबर रोजी बुधाचा पहिला राशीपरिवर्तन होईल, तर 24 ऑक्टोबरला तो पुन्हा एकदा राशी बदलेल. 9 ऑक्टोबरला शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 17 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत संक्रमण करेल. मंगळ वृश्चिकेत प्रवेश करणार असून, शनि मीन राशीत, गुरु मिथुन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत स्थिर राहतील. या ग्रहांच्या हालचालीमुळे चार राशींना विशेष लाभ मिळेल.
या चार राशींसाठी ऑक्टोबर ठरेल भाग्यशाली
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना नशिबाचा खेळ ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ मिळेल. पगारवाढ किंवा नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. जे बेरोजगार आहेत त्यांनाही योग्य नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडकलेली कामे मार्गी लागतील.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांना या महिन्यात आर्थिक आणि कौटुंबिक लाभ होईल. करिअरमध्ये नवीन यश दिसून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध दृढ होतील. अविवाहितांसाठी लग्नाच्या चर्चा रंगतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ स्थैर्य आणि प्रगती घेऊन येईल.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना शुभ राहील. नवी नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या संधी मिळतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. उत्पन्न वाढल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ध्येये साध्य करण्यासाठी हा काळ योग्य ठरेल.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना यशाचा काळ ठरेल. करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल आणि कामगिरीत सुधारणा दिसून येईल. उत्पन्न वाढेल आणि समाजात मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
दरम्यान, ऑक्टोबर 2025 मध्ये होणारे ग्रहांचे संक्रमण काही राशींसाठी शुभफलदायी ठरेल. मेष, वृषभ, कर्क आणि तूळ राशीच्या लोकांना नशीबाची साथ लाभेल. या राशींना करिअर, आर्थिक स्थिती, प्रेम आणि कुटुंब या सर्व क्षेत्रांत सकारात्मक बदल जाणवतील. त्यामुळे या महिन्यातील ग्रहबदलांचे स्वागत सकारात्मकतेने करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देते.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)