TRENDING:

Nidra Devi: निद्रादेवी विषयी अजून तुम्हाला माहीत नाही? झोपताना एक काम, टेन्शनमध्येही लागते शांत झोप

Last Updated:

Nidra Devi Puja: हिंदू शास्त्रांमध्ये झोप ही केवळ शरीराची एक अवस्था नसून, ती एका साक्षात देवीचं स्वरूप मानली गेली आहे. शास्त्रांनुसार झोपेचा संबंध निद्रा देवीशी आहे. निद्रा देवी हे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं असलं, तरी त्या नक्की कोण आहेत याबद्दल अनेकांना माहिती नसते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पूर्वीच्या काळी लोक किती निवांत होते, गप्पा-गोष्टी करायला लोकांकडे वेळ असायचा, पण सध्याच्या काळात मोकळा वेळ नाही आणि त्यामुळे गप्पा-गोष्टी तर दूरच आणि झाल्या तरी ऑनलाईन. सध्याच्या प्रचंड धावपळीच्या आयुष्यात शांत झोप लागणारा माणूस सुखी म्हणावा, अशी स्थिती आहे. हिंदू शास्त्रांमध्ये झोप ही केवळ शरीराची एक अवस्था नसून, ती एका साक्षात देवीचं स्वरूप मानली गेली आहे. शास्त्रांनुसार झोपेचा संबंध निद्रा देवीशी आहे. निद्रा देवी हे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं असलं, तरी त्या नक्की कोण आहेत याबद्दल अनेकांना माहिती नसते. निद्रा देवीच्या कृपेनेच माणसाला सुखाची झोप लागते, असे मानले जाते. म्हणूनच जाणकार झोपण्यापूर्वी निद्रा देवीचं स्मरण करण्याचा सल्ला देतात. निद्रा देवी कोण आहेत आणि शांत झोपेसाठी कोणत्या मंत्राचा उच्चार करावा, याबद्दलची सविस्तर माहिती समजून घेऊ.
News18
News18
advertisement

निद्रादेवी म्हणजे - मार्कंडेय पुराण आणि श्रीदुर्गा सप्तशतीनुसार, निद्रा देवी या साक्षात भगवती महामाया आहेत. जेव्हा सृष्टीचा प्रलय काळ येतो, तेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरात ज्या अवस्थेत लीन असतात, त्याला योगनिद्रा असं म्हणतात. पौराणिक कथेनुसार, जेव्हा मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांचा वध करायचा होता, तेव्हा ब्रह्मादेवांनी भगवान विष्णूंना जागृत करण्यासाठी याच निद्रा देवीची स्तुति केली होती. शास्त्रात निद्रा देवीला तमस गुणाची अधिष्ठात्री मानलं गेलं आहे, पण हा तमस नकारात्मक नसून शरीराला पूर्ण विश्रांती देणारा असतो.

advertisement

झोपताना देवीचं ध्यान करणं का गरजेचे - झोपण्यापूर्वी निद्रा देवीचं स्मरण करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. जेव्हा आपण देवीचं ध्यान करतो, तेव्हा दिवसभरच्या चिंता आणि नकारात्मक विचार शांत होऊ लागतात. यामुळे मन एकाग्र होतं आणि ध्यानाच्या अवस्थेत जातं. जो माणूस शुद्ध मनाने निद्रा देवीचं नाव घेतो, त्याला रात्री भीतीदायक स्वप्नं पडत नाहीत. देवीचं सुरक्षा कवच माणसाच्या मनाचं रक्षण करतं. जर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत झोप येत नसेल, तर निद्रा देवीच्या मंत्राचा जप करणं खूप गुणकारी ठरू शकतं.

advertisement

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोणाची धडधड वाढणार; साप्ताहिक लव्ह राशीफळ

झोपण्यापूर्वी या सिद्ध मंत्राचा करा जप - तुम्ही निद्रानाश किंवा मानसिक तणावात असता, तर अंथरुणावर पडून डोळे मिटा आणि खालील मंत्राचा 3 किंवा 11 वेळा मनातल्या मनात जप करा. दुर्गा सप्तशतीमध्ये निद्रा देवीच्या स्तुतीसाठी या मंत्राचा उल्लेख केला आहे.

advertisement

या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।

या मंत्राचा अर्थ - जी देवी सर्व प्राण्यांमध्ये निद्रेच्या (झोपेच्या) स्वरूपात वास करते, त्या देवीला पुन्हा-पुन्हा नमन करतो.

सोमवारी होणारे चंद्रगोचर अशुभ! 3 राशींच्या करिअर-आर्थिक गोष्टींमध्ये खळबळ उडणार

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Nidra Devi: निद्रादेवी विषयी अजून तुम्हाला माहीत नाही? झोपताना एक काम, टेन्शनमध्येही लागते शांत झोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल