बाबा वेंगांची भाकिते कशी उलगडली जातात?
बाबा वेंगा ही एक प्रसिद्ध बल्गेरियन दृष्टीहीन महिला होती. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला, 12 वर्षे सामान्य माणसाचे जीवन जगल्यानंतर त्या एक भविष्यवक्ता बनल्या. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. पण त्यांनी केलेली भाकिते लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी खरी होताना पाहिली. बाबा वेंगांची भाकिते उलगड्याचे काम वेगवेगळे गट करतात. यासाठी कोणतीही विशिष्ट व्यक्ती जबाबदार नाही.
advertisement
सहसा ही भाकिते खूप अस्पष्ट आणि प्रतीकात्मक असतात जे समजणे खूप कठीण असू शकते. म्हणून, त्यांना समजून घेण्याचे आणि उलगडण्याचे काम ज्योतिषी, इतिहासकार आणि तज्ञ करतात. याशिवाय, वैज्ञानिक समज आणि दृष्टिकोन हा देखील यामध्ये एक मोठा घटक असतो, या घटकाच्या आधारे भाकिताची सखोल तपासणी केली जाते.
त्रासाचे दिवस भयंकर सोसले! या राशींचे आता उजळणार भाग्य; सर्व कामांमध्ये यश-पैसा
सध्या ते का चर्चेत आहेत?
बाबा वेंगांच्या 2025 च्या भाकितानुसार, पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर राहणारे परग्रहवासी (एलियन) नवीन वर्षाच्या ऑक्टोबर 2025 महिन्यात पृथ्वीवर येऊ शकतात. असे मानले जाते की, अनेक वर्षांनी एकदा एलियन नक्कीच पृथ्वीवर परत येतात आणि त्यांचा प्रभाव दाखवतात. शास्त्रज्ञांनी त्यांच्या ज्ञानानुसार आधीच सांगितले आहे की, मानवांव्यतिरिक्त, संपूर्ण विश्वात इतर अनेक प्रकारचे प्राणी राहतात आणि ते आपल्या पृथ्वीवर मानवांनी विकसित केलेल्या सर्व आधुनिक गोष्टींपेक्षाही आघाडीवर आहेत.
37 दिवसांचा अत्यंत खडतर काळ! या राशींच्या जीवनात वाईट प्रसंग; शनिअस्त धोक्याचा
बाबा वेंगा यांनी त्यांच्या भाकितात असे सांगितले आहे की, यावर्षी परग्रही लोक संपूर्ण खंडात कहर माजवतील. ज्यामुळे या वर्षी 2025 मध्ये हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच बाबा वेंगा यांनी असा दावा केला की, येणारे वर्ष "विनाशाची सुरुवात" असू शकते. याशिवाय त्यांनी युरोपमधील भयानक युद्ध आणि राजकीय अस्थिरतेबद्दलही भाष्य केले आहे.