Aajche Rashi Bhavishya, 24 Jan 2025: त्रासाचे दिवस भयंकर सोसले! या राशींचे आता उजळणार भाग्य; सर्व कामांमध्ये यश-पैसा
- Written by:Chirag Daruwalla
- trending desk
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, January 24, 2025: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊया.
मेष (Aries) : आरोग्याच्या दृष्टीनं दिवस चांगला आहे. दिनचर्येत व्यायाम आणि योगासनांचा समावेश करा. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेमसंबंधात गोडवा राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यश मिळवतील. सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने पुढे गेलात तर यश मिळवाल. ध्येय साध्य करण्यासाठी दिवस उत्तम आणि आनंददायी असेल. सर्व कामांमध्ये यश मिळेल.Lucky Color : PurpleLucky Number : 8
advertisement
वृषभ (Taurus) : दिवस अडचणी वाढवणारा आहे. मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. काही प्रकल्पांना उशीर लागू शकतो. संयमाने काम करा. महत्त्वाचा निर्णय पुढे ढकला. वैयक्तिक जीवनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना काळजी घ्या आणि वाद वाढू देऊ नका.Lucky Color : BlackLucky Number : 16
advertisement
मिथुन (Gemini) : आर्थिक बाबतीत चढ-उतार जाणवतील. खर्च वाढल्याने बजेट कोलमडू शकते. गुंतवणूक विचारपूर्वक करा. आत्मपरीक्षणासाठी दिवस चांगला आहे. संयम आणि हुशारीने अडचणींचा सामना करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. जुना एखादा मित्र भेटल्याने मनःशांती लाभेल. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. प्रवासादरम्यान सामानाची काळजी घ्या. वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती आहे. संयम आणि सकारात्मकतेने काम करा. चांगले दिवस लवकरच येतील.Lucky Color : BlueLucky Number : 3
advertisement
कर्क (Cancer) : नवीन नातं सुरू करण्यासाठी दिवस सर्वोत्तम आहे. पैशाच्या बाबतीत दिवस फायदेशीर असेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आर्थिकदृष्ट्या मजबूत वाटेल. महत्त्वाचा आर्थिक निर्णय घेण्यासाठी दिवस योग्य आहे. सर्वच दृष्टिकोनातून दिवस चांगला असेल. आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारानं पुढे जा आणि यशाकडे वाटचाल करा. प्रेमजीवनात दिवस अनुकूल असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि परस्पर सामंजस्य वाढेल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी नवीन प्रस्ताव मिळू शकतो. दिवस प्रत्येक गोष्टीसाठी शुभ आणि सकारात्मक असेल.Lucky Color : Dark GreenLucky Number : 6
advertisement
सिंह (Leo) : नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे आरोग्य चांगले राहील. मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगाची मदत घ्या. विद्यार्थ्यांसाठी दिवस महत्त्वपूर्ण असेल. ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि नवीन विषय समजून घेतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. दिवस सर्वच बाबतीत फायदेशीर आणि उत्साहवर्धक असेल. सकारात्मक विचार कायम ठेवत पुढे जा. प्रेमजीवनात दिवस रोमँटिक असेल. जोडीदारासोबत काही क्षण घालवण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने तुमचा सन्मान वाढेल. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा. दिवस आनंद आणि यशदायी असेल.Lucky Color : BrownLucky Number : 13
advertisement
कन्या (Virgo) : प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल. जुन्या मित्राला भेटल्याने दिवस थोडा चांगला जाईल. संयमाने काम करा. सर्व समस्या वेळेनुसार सुटतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. सकारात्मकता ठेवा. मानसिक तणाव टाळण्यासाठी योगा आणि ध्यानधारणा करा. संध्याकाळची वेळ थोडी दिलासादायक असेल. कोणतेही काम सावधपणे करा. वादविवाद टाळा.Lucky Color : GreenLucky Number : 11
advertisement
तूळ (Libra) : मानसिक तणावामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योगा आणि ध्यानधारणा करा. नियमित व्यायाम करा. संतुलित आहार घ्या. दिवस अडचणी वाढवणारा असला तरी तुम्ही आत्मविश्वास आणि संयमाने समस्यांना तोंड देऊ शकता. कठीण प्रसंग तुम्हाला खंबीर बनवतील. धीर सोडू नका. सकारात्मक विचार ठेवा. प्रियजनांसोबत वेळ घालवा आणि तुमचे विचार त्यांच्याशी शेअर करा. आरोग्याकडे लक्ष द्या. आत्मपरीक्षण करा. चुकांमधून शिका आणि पुढे जा. प्रत्येक परिस्थितीत संयमानं काम करा.Lucky Color : RedLucky Number : 2
advertisement
वृश्चिक (Scorpio) : ऊर्जा आणि उत्साह असल्याने कोणतंही काम करण्यास सक्षम असाल. ध्यानधारणा आणि योगाभ्यासामुळे मानसिक शांती लाभेल. एकूणच दिवस लाभदायक आणि आनंददायी असेल. प्रयत्न यशस्वी होतील. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती कराल. मानसिक शांती मिळाल्याने सर्व कामं सहज पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन स्रोतांकडून पैसे मिळतील. गुंतवणूक हुशारीनं केली तर लाभदायक ठरेल. दिवस सकारात्मक आणि प्रगतीचा आहे.Lucky Color : OrangeLucky Number : 13
advertisement
धनू (Sagittarius) : व्यवसायात नवीन योजनांवर काम करण्याची संधी मिळेल. योजना यशस्वी झाल्याने तुमचे उत्पन्न वाढेल. बँक बॅलन्स सुधारेल. व्यवसायाला नवीन उंचीवर नेण्याची प्रेरणा मिळेल. दिवस सर्वच बाबतीत चांगला आहे. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवत ध्येयाकडे वाटचाल करा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. त्यांचे अभ्यासात मन लागेल. नवीन गोष्टी शिकण्यात रस वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. आत्मविश्वास कायम ठेवा आणि पुढे वाटचाल करा.Lucky Color : MagentaLucky Number : 12
advertisement
मकर (Capricorn) : आरोग्याची काळजी घ्या. मानसिक तणावाचा शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. योगा आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक शांती मिळेल. महत्त्वाचा निर्णय पुढे ढकला. सायंकाळी प्रियजनांसोबत वेळ घालवा. प्रत्येक अडचणीनंतर एक नवीन सकाळ असते. त्यामुळे संयम आणि सकारात्मक विचारानं पुढे जा. आत्मपरीक्षण करा. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.Lucky Color : BlackLucky Number : 3
advertisement
कुंभ (Aquarius) : आरोग्य चांगले राहील. तुम्हाला उत्साही आणि ताजेतवाने वाटेल. नियमित व्यायाम करा. संतुलित आहार घ्या. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. तुमचे ज्ञान आणि अनुभव इतरांसोबत शेअर कराल. तुमच्या सल्ला आणि मार्गदर्शनाचा इतरांना उपयोग होईल. दिवस सर्वच गोष्टींसाठी चांगला आहे. आत्मविश्वासाने पुढे जा आणि यश मिळवा. प्रेम जीवनात दिवस रोमँटिक असेल. जोडीदारासोबत खास क्षण घालवाल. त्यामुळे नातं अधिक घट्ट होईल. सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल करा.Lucky Color : PinkLucky Number : 1
advertisement








