सुतक काळ 9 तास आधी सुरू होईल - चंद्रग्रहण ही केवळ खगोलीय घटना नसून आत्मनिरीक्षण आणि ध्यानासाठी एक विशेष काळ मानला जातो. नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी शास्त्रांमध्ये स्नान, जप आणि दान यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्यानं या ग्रहणाचा सुतक काळ वैध असेल. चंद्रग्रहणाचा सुतक काळ 9 तास आधीच सुरू होतो. प्रत्यक्षात चंद्रग्रहण रात्री 9:57 वाजता सुरू होईल आणि पहाटे 1:27 वाजता संपेल. या चंद्रग्रहणाचा कालावधी 3 तास 28 मिनिटे 2 सेकंद असेल.
advertisement
ग्रहण लागण्यापूर्वी करावयाच्या गोष्टी -
1- तुळशीची पाने पिण्याच्या पाण्यात टाका, अन्न/पाणी झाकून सुरक्षित ठेवा.
2- घरातील देव्हारा झाका किंवा दरवाजे बंद करा आणि मंत्र जप आणि देवाचे ध्यान सुरू करा, जेणेकरून ग्रहणाची नकारात्मक ऊर्जा त्रास देणार नाही. असे केल्याने राहू आणि केतूची अस्वस्थ ऊर्जा देखील संतुलित होते.
या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण पाहू नये; अघटित घडण्याची भीती, संकट ओढावेल
ग्रहणादरम्यान आणि नंतर करावयाच्या गोष्टी -
3- ग्रहणादरम्यान पैसे किंवा इतर कोणत्याही गोष्टींशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा.
4- ग्रहण संपल्यानंतर स्नान करा आणि संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा.
5- ग्रहणानंतर दान करा - विशेषतः तीळ, तांदूळ, गूळ आणि कपडे दान करण्याचा नियम आहे, ज्यामुळे ग्रहण दोष शांत होतो.
ग्रहण काळात विशेष काळजी घ्या -
ग्रहण काळात खाणे, झोपणे, प्रवास करणे आणि शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी - कात्री, सुया किंवा तीक्ष्ण वस्तू वापरण्यास मनाई आहे.
साडेसातीपेक्षाही बेक्कार काळ पाहिला! या राशींचे नशीब पालटणार; सरळमार्गी शनी लकी
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)