चंद्रग्रहण नेमकं कधी आहे, कुठे दिसेल कुठे नाही, होळी-धूलिवंदनच्या विधींवर काय परिणाम होणार असे अनेक प्रश्न निर्माण झालेले. सोमवारी, 2 मार्च रोजी होळी प्रज्वलित झाल्यानंतर ग्रहणामुळे धार्मिक विधी किंवा पुढील दिवसाच्या नियोजनावर काही परिणाम होईल का, असे प्रश्न विचारले जात होते. या पार्श्वभूमीवर, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे.
advertisement
चंद्रग्रहणाची वेळ आणि कालावधी - दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चंद्रग्रहण एक नैसर्गिक खगोलीय आविष्कार असून ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. मुंबईमध्ये सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी चंद्रोदय होईल. विशेष म्हणजे, या ग्रहणाचा काळ अत्यंत अल्प म्हणजे अवघ्या तीन मिनिटांचा असणार आहे. तीन मिनिटेच ते आपल्याला दिसू शकते. त्यासाठी स्वच्छ हवेची गरज आहे.
कारच्या डॅशबोर्डवर फक्त मूर्ती लावून उपयोग नाही; मालकांना हे नियमही माहीत हवेत
होळी आणि धार्मिक नियोजनावर परिणाम नाही - सोमवारी, 2 मार्च रोजी होळी पेटवल्यानंतर मंगळवारी येणाऱ्या ग्रहणाबाबत सोमण यांनी स्पष्ट केले की, ग्रहण काळ अतिशय कमी असल्याने सण साजरा करण्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. ग्रहण काळ सुरू होण्यापूर्वीच अनेक नियोजित गोष्टी पूर्ण झालेल्या असतील. तसेच, ग्रहण काळातही कोणतेही निर्बंध पाळण्याची किंवा सणाच्या उत्साहात खंड पडू देण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. थोडक्यात सांगायचे तर, अवघ्या तीन मिनिटांच्या या चंद्रग्रहणामुळे होळीच्या सणात कोणताही अडथळा येणार नाही, असे दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.
