TRENDING:

Numerology: गुरुवारी भाग्याचं दारं उघडणार! वामन जयंती 3 मूलांकासाठी लकी ठरणार, गुरुकृपा

Last Updated:

Numerology 04 September 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 04 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मूलांक 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

आज गुरुवारी अनपेक्षित समस्यांमुळे ठरवलेलं वेळापत्रक विस्कळीत होईल. मुलांशी संबंधित वाईट बातमी मिळाल्यानं दिवस टेन्शनमध्ये जाईल. आरोग्य उत्तम राहील. उत्साह कायम असेल. आर्थिक लाभ होईल. जोडीदाराला तुमच्या मनातल्या गोष्टी कळतील, अशी अपेक्षा करू नका. धडधडीत बोलून रिकामं व्हा.

Lucky Colour : Grey

Lucky Number 22

मूलांक 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

तुमची वेगळा विचार करण्याची क्षमता या गुरुवारी तुमची वेगळी ओळख निर्माण करील. आज तुमचा मूड चांगला राहील. गेल्या काही दिवसांपासून असलेला ताणतणाव दूर झाल्यानं उत्साही वाटेल. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. विरोधक तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतील. जोडीदाराकडून तुमची काळजी घेतली गेल्यानं आनंदी व्हाल.

Lucky Colour : Orange

Lucky Number : 1

advertisement

मूलांक 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कामात लक्ष द्यावं लागेल, तुमचे विरोधक त्यांच्या कार्यक्षमतेच्या बळावर वेगानं प्रगती करीत आहेत. गुरुवारी आत्मसंतुष्ट होऊन चालणार नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारात गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल, तर तुमची निराशा होऊ शकते. काळजी घ्या. यासाठी सध्या वेळ अनुकूल नाही. प्रेमाच्या बाबतीत एखादी नवीन व्यक्ती तुमच्या जीवनात येऊ शकते. तुम्ही त्या व्यक्तीकडे आकर्षित व्हाल.

advertisement

Lucky Colour : Black

Lucky Number : 6

मूलांक 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

गुरुवारी आपल्या कामांकडे लक्ष द्या, सध्या इतरांच्या समस्यांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊ नका. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत विश्रांती घ्या. तुम्ही स्वतःसाठी निश्चित केलेली उद्दिष्टं सहज साध्य कराल. आजची सायंकाळ जोडीदासोबत आनंदात आणि प्रेमानं जाईल. त्यासाठी वेळ खूप अनुकूल आहे.

advertisement

Lucky Colour : Indigo

Lucky Number : 17

मूलांक 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

गुरुवारी तुम्हाला कामात इतरांचा पाठिंबा मिळाल्यानं फायदा होईल. कला, साहित्य आणि संगीतात रस राहील. दार काळजीपूर्वक लॉक करा. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा काळजी घेणं केव्हाही फायद्याचं ठरतं. एखाद्या मालमत्तेच्या डीलद्वारे फायदा होऊ शकतो. जोडीदाराचं आरोग्य बिघडल्यानं काळजी वाढेल.

Lucky Colour : Pink

Lucky Number : 2

मूलांक 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

आज गुरुवारी कोणत्याही कामात आत्मविश्वासानं परिस्थितीला सामोरं जाऊ शकाल. तुमची स्वप्न प्रत्यक्षात येतील. मुलांच्या शाळेतून चांगली बातमी मिळेल. विरोधकांवर सहज मात कराल. व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. करिअरच्या दृष्टीने फायदा होईल. तुमच्या जोडीदारावर विनाकारण संशय घेण्याचं टाळा. नात्यात दुरावा येईल.

Lucky Colour : Brown

Lucky Number : 18

अहंकाराचा वारा न लागो..! तुमच्या राशीला साडेसाती कधी? 2050 पर्यंतची शनिची चाल

मूलांक 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

गुरुवार अनेक बाबतीत खास असेल, आज ऑफिसमध्ये काम करताना अपेक्षेपेक्षा लवकर यश मिळेल. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होत होतील, आर्थिक लाभ होईल. ऑफिसमध्ये बॉसशी मतभेद होऊ शकतात, कामात सावध राहा. भविष्यातील प्लॅन करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

Lucky Colour : Red

Lucky Number : 1

मूलांक 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज गुरुवार खास आहे, आपण जे काही काम हाती घ्याल, त्यामध्ये यश मिळेल; पण तुमच्या वाटचालीत चढ-उतार राहतील. घरासाठी वस्तू खरेदी केल्यानं खरेदीचा उत्साह दिसून येईल. मालमत्तेची खरेदी पूर्ण करण्यासाठी चांगली वेळ आहे. परिश्रम केल्यानं आर्थिक लाभ होतील. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी असणारं नातं त्रासदायक ठरू शकतं. काळजी घ्या.

Lucky Colour : Green

Lucky Number : 5

दिवाळीच्या दोन दिवस आधी गुरू उजळवणार 3 राशींचे नशीब; आनंद-सुखात दुप्पट वाढ

मूलांक 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज गुरुवारी बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेले काम होईल. काही वेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणं फायदेशीर ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापारातून मोठा नफा मिळेल. तुमचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो. अशा परिस्थितीत प्रेमानं परिस्थिती हाताळा. फायद्याचं ठरेल.

Lucky Colour : Magenta

Lucky Number : 3

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: गुरुवारी भाग्याचं दारं उघडणार! वामन जयंती 3 मूलांकासाठी लकी ठरणार, गुरुकृपा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल