ShaniDev: अहंकाराचा वारा न लागो..! तुमच्या राशीला साडेसाती कधी लागणार? 2050 पर्यंतची शनिची चाल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार शनिची साडेसाती खडतर मानली जाते. साडेसाती म्हणजे सुमारे साडेसात वर्षांचा कालावधी. हा कालावधी शनीच्या एका राशीतील संक्रमणावर अवलंबून असतो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात.
advertisement
उदाहरणार्थ: समजा तुमची रास मकर आहे. तर, जेव्हा शनी तुमच्या राशीच्या मागच्या राशीत म्हणजेच धनु राशीत प्रवेश करतो, तेव्हा तुमच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होतो. त्यानंतर शनी तुमच्या राशीत, म्हणजेच मकर राशीत येतो. हा साडेसातीचा दुसरा टप्पा असतो. शेवटी शनी तुमच्या राशीच्या पुढच्या राशीत, म्हणजेच कुंभ राशीत येतो. हा साडेसातीचा तिसरा टप्पा असतो. या तीन टप्प्यांमध्ये मिळून, साडेसात वर्षांसाठी तुमच्यावर साडेसातीचा प्रभाव असतो.
advertisement
साडेसाती कशामुळे लागते - साडेसाती लागते या शब्दाचा अर्थ म्हणजे शनीच्या ज्योतिषीय स्थितीमुळे त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर दिसून येतो. शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. त्यामुळे त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी हा न्यायाचा आणि कर्माचा दाता आहे. साडेसातीदरम्यान शनी माणसाला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचे फळ देतो. जर व्यक्तीने चांगले कर्म केले असतील, तर साडेसातीचा काळ त्यांना शुभ फळ देतो. पण, जर कर्म वाईट असतील, तर या काळात अडचणींचा सामना करावा लागतो.
advertisement
अनेक ज्योतिषी साडेसातीला जीवनातील एक परीक्षेचा काळ मानतात. या काळात व्यक्तीला धैर्य, संयम आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व समजते. यामुळे ती व्यक्ती अधिक जबाबदार आणि परिपक्व बनते. शनीची स्थिती प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार वेगळी असते, त्यामुळे साडेसातीचा प्रभाव प्रत्येकासाठी सारखा नसतो. कुणाच्या कुंडलीत शनी मजबूत असेल, तर त्याला साडेसातीचा त्रास कमी होतो.
advertisement
साडेसातीच्या दृष्टिकोनातून बारा राशींचा विचार करता, मेष राशीला 29 मार्च 2025 ते 31 मे 2032 पर्यंत, वृषभ राशीला 3 जून 2027 ते 13 जुलै 2034 पर्यंत, मिथुन राशीला 8 ऑगस्ट 2029 ते 27 ऑगस्ट 2036 पर्यंत, कर्क राशीला 31 मे 2032 ते 22 ऑक्टोबर 2038 पर्यंत, सिंह राशीला 13 जुलै 2034 ते 29 जानेवारी 2041 पर्यंत, कन्या राशीला 27 ऑगस्ट 2036 ते 12 डिसेंबर 2043 पर्यंत, तूळ राशीला 22 ऑक्टोबर 2038 ते 8 डिसेंबर 2046 पर्यंत, वृश्चिक राशीला 28 जानेवारी 2041 ते 3 डिसेंबर 2049 पर्यंत तर धनू राशीला 12 डिसेंबर 2043 ते 3 डिसेंबर 2049 पर्यंत साडेसाती असेल.
advertisement
कुंभ राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. 23 फेब्रुवारी 2028 रोजी या राशीच्या व्यक्तींची साडेसातीतून सुटका होईल. मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. 7 एप्रिल 2030 पर्यंत या राशीला शनीची साडेसाती असेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)