आज केलेल्या कामामुळे सध्या सुरू असलेल्या समस्या सोडवू शकाल. प्रवास फायद्याचे ठरतील. सगळी कामं, व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवू शकाल. इगो सोडला, तर काम सहजपणे पूर्ण होऊ शकेल. आरोग्य सुधारेल. बँकबॅलन्स वाढेल.
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
बिझनेसचं काही काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. एखादी चांगली बातमी मिळेल. सगळ्या समस्यांशी यशस्वीरीत्या दोन हात कराल. नफ्याचा काळ आहे. सर्व कर आणि अन्य शुल्क योग्यरीत्या भरलं जाईल. गाय पाळावीशी वाटेल.
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
खर्च वाढल्यामुळे बजेट कोलमडू शकेल. मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागतील. असमाधानी आणि उदास वाटेल. कुटुंबीय आणि जोडीदार यांच्यामुळे चिंता वाटेल. दुपारी कामातून फायदा होईल. प्रवास उपयुक्त ठरतील. रूटीनचं काम सहज पूर्ण होईल. मनोबल उच्च असेल.
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज काही पैसे मिळतील. कामावर लक्ष केंद्रित करणं फायद्याचं ठरेल. शारीरिक आरामही वाढेल. अधिक चांगली आणि अधिक वाहनं येतील. क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी घ्याल. त्यामुळे तुम्ही सिस्टिमॅटिक कार्यशैली अंगीकाराल.
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
अडकलेले पैसे परत मिळतील. पैशांचा प्रवाह वेगवान आणि विपुल असेल. इंटरव्ह्यू किंवा परीक्षेचे रिझल्ट्स प्रोत्साहनकारक असतील. धर्मादाय कार्यात सहभागी व्हाल. देवाच्या कृपेने उद्दिष्टपूर्ती होईल.
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंदी व्हाल. सर्व प्रयत्न यशस्वी होतील. कोणी तरी तुम्हाला मूर्ख बनवेल. त्यामुळे फोनवर बोलताना सावधगिरी बाळगा. शत्रू सार्वजनिकरीत्या तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. घरातल्या दुरुस्तीच्या कामांमध्ये बराच वेळ जाईल.
अंगठ्यावरच्या खुणा सांगतील तुम्ही किती भाग्यवान! आकारावरून कळू शकतात या गोष्टी
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्हाला नवी पोझिशन किंवा पद मिळेल. प्रॉपर्टीत बदल करण्यासाठी तुम्ही प्रत्येकाचं सहकार्य घ्याल. नवं तंत्र शिकायला तुम्हाला आवडेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या साह्याने सगळं नियोजन कराल. व्हीआयपी अर्थात महत्त्वाच्या व्यक्तीच्या भेटीच्या शक्यतेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आरोग्याच्या समस्या आज वाढू शकतात. ड्रायव्हिंग करताना सावध राहा. अपघाताची शक्यता आहे. बिझनेस आणि व्यावसायिक वाढ थांबण्याची शक्यता आहे. अत्यंत सावधगिरीने पुढे जा. जवळच्या व्यक्ती फसवण्याची शक्यता आहे. तुम्हाला आवड नसलेली कामं करावी लागण्याची शक्यता आहे.
द्विद्वादश योग! खूप त्रास सोसल्याचं आता फळ; या राशींवर सूर्य-शनी मेहबान
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कामात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले पैसे कमावू शकता. संपूर्ण शांततेने काम कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. तुमच्या मुलांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. खर्च जास्त असतील. उत्पन्नही जास्त असेल.
