TRENDING:

Last Amavasya: शेवटच्या अमावस्येला घरातून इडा-पिढा कायमची टळेल; 4 उपायांनी कुटुंबावरील अशुभ दूर

Last Updated:

December Amavshya: या वर्षातील ही शेवटची मार्गशीर्ष अमावस्या आहे. हा दिवस विशेषतः पितरांना समर्पित मानला जातो. अमावस्या तिथीला पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांनी केलेले तर्पण, दान आणि पूजा स्वीकारतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या बदल्यात ते कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावस्येला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं स्थान आहे. या वर्षातील ही शेवटची अमावस्या आहे. हा दिवस विशेषतः पितरांना समर्पित मानला जातो. अमावस्या तिथीला पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांनी केलेले तर्पण, दान आणि पूजा स्वीकारतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या बदल्यात ते कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. वैदिक पंचांगानुसार, या वर्षी मार्गशीर्ष अमावस्या 19 डिसेंबर रोजी येत आहे आणि या दिवशी अनेक शुभ योग जुळत असल्यामुळे तिचं महत्त्व अधिक वाढलं आहे. ज्योतिष्यांच्या मते, या दिवशी काही विशेष उपाय केल्यास शुभ फळ मिळतं आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी करायच्या खास उपायांबद्दल जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

मार्गशीर्ष अमावस्या दान-स्नानाचे शुभ मुहूर्त -

पंचांगानुसार, मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5:19 ते 6:14 वाजेपर्यंत राहील. हा काळ स्नान, ध्यान आणि सर्व धार्मिक कार्यांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी 11:58 ते 12:39 वाजेपर्यंत राहील, तो दान-पुण्य करण्यासाठी सर्वात उत्तम काळ आहे. मार्गशीर्ष अमावस्येला लाभ-उन्नतीचा शुभ मुहूर्त सकाळी 8:26 ते 9:43 वाजेपर्यंत आणि अमृत-सर्वोत्तम मुहूर्त 9:43 ते 11:01 वाजेपर्यंत राहील. या वेळी केलेली कार्ये विशेष फलदायी मानली जातात.

advertisement

तुम्हालाही अचानक रात्री 2:30 ते 4:00 वाजता जाग येते? खूप विशेष गोष्टीचा तो संकेत

मार्गशीर्ष अमावस्येचे उपाय -

मार्गशीर्ष अमावस्येच्या सकाळी पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर नदीपर्यंत जाणे शक्य नसेल, तर घरीच पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करता येते. स्नानानंतर पितृ तर्पण करण्याची परंपरा आहे. तर्पण नेहमी दक्षिण दिशेकडे तोंड करून केले जाते, कारण दक्षिण दिशा पितरांची दिशा मानली गेली आहे. पाण्यात तीळ मिसळून तर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घर-परिवारात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता वाढते.

advertisement

मार्गशीर्ष अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या दारात किंवा पितरांना समर्पित असलेल्या ठिकाणी दीप लावण्याची परंपरा आहे. दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण या दिशेने ठेवलेला दिवा पितरांपर्यंत प्रकाश पोहोचवतो आणि त्यांना प्रसन्न करतो. यामुळे कुटुंबावर पितरांची कृपा कायम राहते.

मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाची तीन वेळा परिक्रमा करा आणि त्याच्याखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. या उपायाने जीवनातील अडचणी दूर होतात आणि पितर व पूर्वजांची विशेष कृपा मिळते असे मानले जाते.

advertisement

मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा-पाठासोबत एक विशेष कार्य अवश्य करावे. या दिवशी कमीतकमी 11 किंवा 21 वेळा शनि स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असं केल्याने व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा टिकून राहते, जीवनात सुख-समृद्धी वाढते आणि घरातील वातावरणही चांगले राहते.

advertisement

धनू, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; डिसेंबरच्या मध्यात नशीब पुन्हा..

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं लावलं डोकं, डाळिंबाच्या बागेत घेतलं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Last Amavasya: शेवटच्या अमावस्येला घरातून इडा-पिढा कायमची टळेल; 4 उपायांनी कुटुंबावरील अशुभ दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल