TRENDING:

Dhanishta Nakshatra: धनिष्ठा..! नावाप्रमाणेच धनिष्ठ राहतात या नक्षत्रावर जन्मलेले! स्वभावापासून ते करिअर कसं?

Last Updated:

Dhanishta Nakshatra : हे नक्षत्र मकर राशीच्या शेवटच्या भागापासून सुरू होऊन कुंभ राशीच्या सुरुवातीच्या भागापर्यंत पसरलेले असते. धनिष्ठा शब्दाचा अर्थ अत्यंत समृद्ध किंवा धनाने भरलेला असा होतो. ढोल किंवा नगारा हे या नक्षत्राचे प्रतीक आहे, ते संगीत आणि आवाजाशी संबंधित आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जन्मकुंडलीमध्ये नक्षत्राचे महत्त्वाचे स्थान आहे. जन्म नक्षत्रावरून व्यक्तिविषयीच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात. ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्रांचा मानवी जीवनावर सखोल परिणाम होतो. धनिष्ठा नक्षत्र हे 27 नक्षत्रांच्या मालिकेत 23 व्या स्थानी येते. या नक्षत्राला समृद्धी आणि प्रसिद्धीचे प्रतीक मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेले लोक गर्दीतही आपली वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांचा संबंध धन, ताल आणि नेतृत्वाशी असतो. हे लोक केवळ स्वप्ने पाहत नाहीत, तर ती पूर्ण करण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतात.
News18
News18
advertisement

धनिष्ठा नक्षत्र म्हणजे काय?

हे नक्षत्र मकर राशीच्या शेवटच्या भागापासून सुरू होऊन कुंभ राशीच्या सुरुवातीच्या भागापर्यंत पसरलेले असते. धनिष्ठा शब्दाचा अर्थ अत्यंत समृद्ध किंवा धनाने भरलेला असा होतो. ढोल किंवा नगारा हे या नक्षत्राचे प्रतीक आहे, ते संगीत आणि आवाजाशी संबंधित आहे. या नक्षत्रात शनी आणि मंगल या दोन्ही ग्रहांची ऊर्जा दिसून येते. शनी शिस्त आणि मेहनत शिकवतो, तर मंगल धाडस आणि पुढे जाण्याची शक्ती देतो.

advertisement

धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी ग्रह - धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ हा ऊर्जा, साहस आणि कृतीचा कारक मानला जातो. मंगळाच्या प्रभावामुळे या नक्षत्रातील व्यक्ती घाबरत नाही, कठीण प्रसंगातही हिमतीने पुढे जातात. हे लोक नशिबावर अवलंबून न राहता स्वतःचा मार्ग स्वतः तयार करण्यावर विश्वास ठेवतात.

या नक्षत्रात जन्मलेले लोक सहसा खूप उत्साही आणि स्वावलंबी असतात. ते कष्टाळू असून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची उपजत क्षमता असते. संगीत, नृत्य किंवा कलेमध्ये त्यांना विशेष आवड असू शकते. पैसा कमवण्यात आणि तो टिकवण्यात हे लोक पटाईत असतात. सामाजिक जीवनात त्यांचा वावर चांगला असतो, मात्र कधीकधी राग आणि हट्टीपणा ही त्यांची कमकुवत बाजू ठरू शकते. आपल्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करणे त्यांना थोडे कठीण जाते.

advertisement

प्रत्येक महिन्याला शिवरात्री असते मग महाशिवरात्री का साजरी करतात? बरोबर उत्तर...

करिअर आणि कामकाज - धनिष्ठा नक्षत्रातील व्यक्ती अनेक क्षेत्रांत चांगली प्रगती करू शकतात. विशेषतः संगीत, गायन, अभिनय आणि मनोरंजन क्षेत्रात त्यांना यश मिळते. तसेच सैन्य, पोलीस, सुरक्षा दले, रिअल इस्टेट, बांधकाम, बँकिंग, गुंतवणूक आणि फायनन्स या क्षेत्रांतही ते नाव कमावू शकतात. व्यवस्थापन, प्रशासन, क्रीडा आणि राजकारण ही क्षेत्रेही त्यांच्यासाठी अनुकूल असतात. निर्णय घेण्याची त्यांची क्षमता हीच त्यांची सर्वात मोठी ताकद असते.

advertisement

विवाह आणि नातेसंबंध - नात्यांच्या बाबतीत हे लोक प्रामाणिक आणि जबाबदार असतात. आपल्या जोडीदाराशी ते एकनिष्ठ राहतात आणि कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडतात. आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. मात्र, अति स्वावलंबी वृत्तीमुळे कधीकधी नात्यात दुरावा येऊ शकतो, त्यामुळे त्यांनी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि स्वप्नांचा आदर करणारा जोडीदार त्यांच्यासाठी सर्वोत्तम ठरतो.

advertisement

पुढचे 4 महिने धोक्याचे! कर्कसह 3 राशींच्या वाट्याला त्रास; उत्तराभाद्रपदेत शनी

धनिष्ठा नक्षत्राचे उपाय आणि मंत्र - मंगळवारी हनुमानजींची पूजा करणे या नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक असते. लाल रंगाच्या वस्तूंचे दान करावे. मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योग यांचा आधार घ्यावा. संगीत ऐकणे किंवा एखादे वाद्य शिकणे त्यांच्यासाठी शुभ ठरते.

मंत्र:

ॐ धनिष्ठायै नमः

ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पाचव्या दिवशीच केला विधी पूर्ण, वृक्षारोपणातून मातृस्मृती जपणारे भानुसे कुटुंब ‎
सर्व पहा

धनिष्ठा नक्षत्रात काय करावे आणि काय टाळावे - नवीन कामाची सुरुवात, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय, वित्तविषयक कामे आणि मशिनरीशी संबंधित कामांसाठी हे नक्षत्र शुभ असते.तसेच रागाच्या भरात निर्णय घेणे, विचार न करता धोका पत्करणे, कोणालाही पैसे उधार देणे आणि अहंकार किंवा दिखावा करणे टाळावे.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Dhanishta Nakshatra: धनिष्ठा..! नावाप्रमाणेच धनिष्ठ राहतात या नक्षत्रावर जन्मलेले! स्वभावापासून ते करिअर कसं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल