Maha Shivratri 2026: प्रत्येक महिन्याला शिवरात्री असते मग महाशिवरात्री का साजरी करतात? बरोबर उत्तर...
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Maha Shivratri 2026: शिवपुराणानुसार, माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला भगवान सदाशिव पहिल्यांदा दिव्य लिंग स्वरूपात प्रकट झाले होते. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ आहे, या वादाचा निकाल देण्यासाठी भगवान सदाशिव एका विशाल प्रकाशमय लिंगाच्या रूपात प्रकट झाले, ज्याचा आदि किंवा अंत कोणालाही..
मुंबई : शिवभक्तांना आता महाशिवरात्रीचे वेध लागले आहेत. महाशिवरात्रीचा पवित्र सण शिवभक्तांसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. यावर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी, रविवार रोजी साजरी केली जाईल. पंचांगानुसार, हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. महाशिवरात्री का साजरी केली जाते, या प्रश्नावर अनेक लोक या दिवशी शिव-पार्वतीचा विवाह झाला असे उत्तर देतात, परंतु शिवपुराणानुसार हे उत्तर पूर्णपणे योग्य नाही.
महाशिवरात्री का साजरी करतात?
शिवपुराणानुसार, माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला भगवान सदाशिव पहिल्यांदा दिव्य लिंग स्वरूपात प्रकट झाले होते. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ आहे, या वादाचा निकाल देण्यासाठी भगवान सदाशिव एका विशाल प्रकाशमय लिंगाच्या रूपात प्रकट झाले, ज्याचा आदि किंवा अंत कोणालाही सापडला नाही. यावरूनच दोघांना सदाशिवाच्या अथांग रूपाची जाणीव झाली.
advertisement
सोप्या भाषेत सांगायचे तर, माघ कृष्ण चतुर्दशीला भगवान शिवाच्या शिवलिंग स्वरूपाचा जन्म झाला. शिव पूर्वी निराकार होते, परंतु याच दिवशी ते प्रथमच साकार रूपात प्रकट झाले. म्हणूनच या तिथीला शिवलिंगाच्या जन्माचा सोहळा किंवा महाशिवरात्री म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे.
शिव-पार्वती विवाह आणि महाशिवरात्री - अनेकांचा असा समज आहे की महाशिवरात्रीला शिव-पार्वतीचा विवाह झाला होता, मात्र शिवपुराणातील संदर्भ वेगळे सांगतात. शिवपुराण रुद्र संहितेनुसार, शिवाचा विवाह सतीशी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला झाला होता.
advertisement
तर, देवी पार्वतीशी झालेला शिवाचा दुसरा विवाह मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष द्वितीया तिथीला झाला होता. रुद्र संहितेच्या 58 ते 61 व्या श्लोकांमध्ये या विवाहाचे सविस्तर वर्णन दिले आहे. त्यामुळे महाशिवरात्री हा विवाहाचा नव्हे, तर शिवाच्या शिवलिंग रूपात प्रकट होण्याचा उत्सव आहे.
महाशिवरात्री व्रत आणि पूजेचे फळ - महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाचा जलाभिषेक केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. शिवाच्या कृपेने सर्व प्रकारचे कष्ट, रोग, दोष आणि संताप दूर होतात. महादेवाच्या आशीर्वादाने भक्ताला संतान सुख, धन, संपत्ती, समृद्धी, शक्ती, आरोग्य आणि पराक्रम प्राप्त होतो. या दिवशी उपवास करून विधीवत पूजा केल्याने शिवाची विशेष कृपा प्राप्त होते.
advertisement
राशीनुसार काय अर्पण करावे -
मेष आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर मधाने अभिषेक करावा आणि लाल रंगाची फुले अर्पण करावीत, यामुळे पराक्रम वाढतो. वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांनी कच्च्या दुधाने किंवा दह्याने अभिषेक करून पांढरी फुले वाहिल्यास जीवनात सुख-समृद्धी येते. मिथुन आणि कन्या राशीसाठी उसाचा रस किंवा हिरव्या मूग डाळीचे पाणी अर्पण करणे शुभ असून, यामुळे बुद्धी आणि व्यापारात प्रगती होते. कर्क राशीच्या व्यक्तींनी चंदनाचा लेप आणि गंगाजल अर्पण केल्यास मानसिक शांती लाभते, तर सिंह राशीच्या लोकांनी पाण्यात कुंकू मिसळून किंवा पंचामृताने अभिषेक केल्यास समाजात मानसन्मान वाढतो.
advertisement
धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी पाण्यात हळद किंवा केशर मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा, यामुळे भाग्याची साथ मिळते. मकर आणि कुंभ राशीसाठी मोहरीचे तेल किंवा काळे तीळ पाण्यात टाकून अर्पण करणे अत्यंत प्रभावी ठरते, यामुळे शनीचे दोष दूर होऊन अडकलेली कामे मार्गी लागतात. सर्व राशींच्या व्यक्तींनी पूजेच्या शेवटी बेलपत्र आणि शमीची पाने अर्पण करावीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 11:40 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Maha Shivratri 2026: प्रत्येक महिन्याला शिवरात्री असते मग महाशिवरात्री का साजरी करतात? बरोबर उत्तर...










