Badlapur News : मोबाईलसाठी अंगात शिरला सैतान, धावत्या लोकल ट्रेनमध्ये केलं असं, सगळेच हादरले
Last Updated:
Shocking Incident local Train : मुंबई लोकलमध्ये मोबाईल चोरीच्या प्रयत्नात तरुणाला धावत्या ट्रेनमधून ढकलल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत तरुणाचा पाय चिरडला गेला असून त्याची प्रकृती नाजूक आहे.
बदलापूर : मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. धावत्या लोकलमधील मोबाईल चोरीचा प्रयत्न थेट एका तरुणाच्या आयुष्यावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूरला जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये मोबाईल चोरट्याने प्रवाशाला धक्का दिल्याने तो थेट ट्रेनच्या चाकाखाली गेला. या भीषण अपघातात तरुणाचा पाय अक्षरशः चिरडला गेला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
लोकलमधील 'त्या' धक्क्याने घात केला
रितेश राकेश येरूणकर असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. रितेश हा बदलापूर पूर्वेतील आनंदनगर परिसरात राहत असून नवी मुंबईतील सीवुड्स दारावे येथील एका मॉलमधील कपड्याच्या दुकानात काम करत होता. 18 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 वाजता त्याने ठाणे स्थानकावरून बदलापूरकडे जाणारी फास्ट लोकल पकडली होती.
रेल्वेच्या माहितीनुसार, रात्री 11.45 वाजता ट्रेन अंबरनाथ स्थानकाच्या दिशेने येत असताना शेजारी बसलेल्या एका तरुणाने अचानक रितेशच्या हातातील मोबाईल खेचला. रितेशने याला विरोध केला असता आरोपीने त्याला जोरात धक्का दिला. क्षणातच रितेश धावत्या ट्रेनमधून खाली फेकला गेला.
advertisement
खाली पडताना रितेशचा डावा पाय थेट ट्रेनच्या चाकाखाली आला. यात त्याच्या पायाचे तुकडे झाले. डोक्याला आणि चेहऱ्यालाही गंभीर दुखापत झाली असून डोळे सुजले आहेत. घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात दाखल केले. नंतर त्याला मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या नाजूक आहे.
आरोपीला अटक
या प्रकरणी कल्याण जीआरपीने कैलाश बाळकृष्ण जाधव याला अटक केली आहे. या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी लोकल ट्रेनमधील सुरक्षेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 11:49 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Badlapur News : मोबाईलसाठी अंगात शिरला सैतान, धावत्या लोकल ट्रेनमध्ये केलं असं, सगळेच हादरले









