राजकारणात भूकंप! भाजपचा MIM सोबत हातात 'हात', कुठे झाली पतंग अन् कमळाची युती
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. सत्तेसाठी भाजपनं थेट एमआयएम पक्षाशी युती केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. सत्तेसाठी भाजपनं थेट एमआयएम पक्षाशी युती केली आहे. निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांवर सडकून टीका करत होते. काहीही झालं तरी भाजपसोबत जायचं नाही, अशी भूमिका एमआयएमचे अध्यक्ष असदद्दीन ओवेसी यांनी घेतली होती. मात्र आता अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे.
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याची प्रचिती पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्याने दिली आहे. अचलपूर नगरपरिषदेत झालेल्या एका अनपेक्षित राजकीय घडामोडीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. कट्टर वैचारिक विरोधक मानले जाणारे भाजप आणि एमआयएम (MIM) आता सत्तेसाठी एकाच जहाजात स्वार झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
अचलपूरचे 'विचित्र' समीकरण
advertisement
अचलपूर नगरपरिषदेच्या समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपने एमआयएमला सोबत घेत आपली पकड मजबूत केली आहे. विशेष म्हणजे, या युतीमुळे एमआयएमच्या पदरात महत्त्वाचे पदही पडले आहे. एमआयएमच्या एका नगरसेवकाची शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापती पदी वर्णी लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अचलपूर नगर परिषदेत एमआयएमचे तीन नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन तर अपक्ष तीन नगरसेवक निवडून आले होते. या सर्वांनी एकत्रित गट बनवून भाजपला पाठिंबा दिला आहे. स्थानिक पातळीवर हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. हा निर्णय घेताना स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना विचारात घेतलं होतं का? घेतलं नसेल तर पक्षाकडून काही कारवाई केली जाऊ शकते का? हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 11:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राजकारणात भूकंप! भाजपचा MIM सोबत हातात 'हात', कुठे झाली पतंग अन् कमळाची युती









