पितृपक्षात कोणती कामं करू नयेत:
1. मांसाहारी अन्न आणि मद्यपान टाळा - पितृपक्षात सात्विक अन्न सेवन करावे. मांसाहारी अन्न, मद्य किंवा कोणत्याही तामसिक पदार्थाचे सेवन करणे योग्य मानले जात नाही. त्यानं पूर्वज दु:खी नाराज होतात.
2. केस-दाढी करू नका
या काळात केस कापणे, दाढी करणे किंवा सौंदर्य उपचार करणे यासारखी कामे निषिद्ध मानली जातात. हा काळ सौंदर्य प्रदर्शनाचा नाही तर संयम आणि श्रद्धेचा आहे.
advertisement
3. नवीन कपडे किंवा दागिने खरेदी करू नका
पितृपक्ष हा शुभ कार्यासाठी योग्य काळ मानला जात नाही. या काळात नवीन कपडे, दागिने किंवा घराच्या सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे.
सकाळ, दुपार, संध्याकाळ! विसर्जनासाठी गणेश मूर्ती जागेवरून हलवण्याचा शुभ मुहूर्त
4. लग्न, गृहप्रवेश किंवा कोणतेही शुभ कार्य करू नका
श्राद्ध पक्षात लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. हा काळ पूर्वजांना समर्पित आहे, उत्सवांसाठी नाही.
5. खोटे बोलणे, अपशब्द वापरणे
या काळात आपण संयमाने बोलावे, चांगले वर्तन ठेवले पाहिजे. खोटं बोलणं, अपशब्द वापरणे किंवा एखाद्याचा अपमान करणे यामुळे पूर्वजांचा क्रोध येऊ शकतो.
6. श्राद्ध कर्मात निष्काळजीपणे करू नका
घरी तुम्ही श्राद्ध करत असाल तर कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. अन्न शुद्ध आणि सात्विक असले पाहिजे आणि विधींचे पालन करणे आवश्यक आहे.
7. मोहरी, लसूण, कांदा यासारखे तामसिक पदार्थ टाळा
श्राद्धात या पदार्थांचा वापर करण्यास मनाई आहे, कारण ते तामसिक स्वरूपाचे असतात आणि पर्यावरणाच्या शुद्धतेवर परिणाम करतात. पितृपक्ष हा आत्मा आणि पूर्वजांच्या शांतीबद्दल आदर व्यक्त करण्याचा काळ आहे. या दिवसांत संयम, श्रद्धा आणि सात्विकता पाळणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करून तुम्ही पूर्वजांचे आशीर्वाद मिळवू शकता आणि तुमच्या जीवनात आनंद आणि शांती टिकवू शकता.
लॉस अपयश मानसिक ताण..! सगळ्यातून बाहेर पडणार; चतुर्ग्रही योग 3 राशींना लकी ठरेल
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)