Astrology: लॉस, अपयश, मानसिक ताण..! आता सगळ्यातून बाहेर पडणार; चतुर्ग्रही योग जुळल्यानं 3 राशींचा भाग्योदय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ठराविक काळानंतर ग्रहांचे संक्रमण होत राहते, त्यातून त्रिग्रही आणि चतुर्ग्रहीसारखे योग निर्माण होतात. सुख-संपत्तीचा कारक शुक्र ग्रह 15 सप्टेंबर रोजी सिंह राशीत संक्रमण करेल, तिथे तो 9 ऑक्टोबरपर्यंत राहील.
advertisement
वृश्चिक - चतुर्ग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीच्या कर्मभावावर तयार होणार आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला काम-व्यवसायात प्रगती मिळू शकते. तसेच, हा योग तुम्हाला व्यावसायिक यश देईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्जनशीलता आणि नेतृत्व कौशल्यांचे कौतुक केले जाईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाऊ शकते. त्याचबरोबर व्यवसायिकांना चांगले पैसे मिळू शकतात. तसेच, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.
advertisement
कर्क - चतुर्ग्रही योगाच्या निर्मितीमुळे कर्क राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हे योग तुमच्या राशीच्या धन घरावर तयार होणार आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अचानक पैसे मिळू शकतात. तसेच ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना पैसे कमविण्याच्या संधी मिळतील. तसेच, गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
मेष - चतुर्ग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीच्या पाचव्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्हाला प्रेम संबंधात असलेल्यांना यश मिळू शकते. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद निर्माण होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक खोल भावनिक बंध अनुभवाल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


