'या' 3 राशींसाठी फेब्रुवारी महिना ठरेल कठीण
मकर
फेब्रुवारी महिन्यात सूर्याचे संक्रमण मकर राशीतून कुंभ राशीत होणार असले, तरी ग्रहण योगाचा थेट परिणाम तुमच्या राशीवर दिसेल. या काळात तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळे आणि पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. सरकारी कामात अडथळे येतील आणि वरिष्ठांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. मकर राशीच्या लोकांनी या महिन्यात सूर्याला अर्घ्य देणे थांबवू नये आणि शनिवारी गरिबांना काळे तीळ दान करावेत.
advertisement
कुंभ
कुंभ राशीतच शनीचे भ्रमण सुरू आहे आणि त्यातच सूर्य आणि राहु-केतूच्या स्थितीमुळे ग्रहण योग अधिक प्रभावी ठरेल. तुमच्या मनात विनाकारण भीती आणि अस्वस्थता राहील. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांनी कागदपत्रांची नीट तपासणी करावी, अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या जातकांनी 'महामृत्युंजय मंत्राचा' जप करावा आणि शक्य असल्यास रुद्राभिषेक करावा.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा शेवटचा पंधरावडा आर्थिक बाबतीत चिंताजनक ठरू शकतो. खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतील, ज्यामुळे कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू तुमच्या प्रतिमेला तडा लावण्याचा प्रयत्न करतील. प्रवासादरम्यान सामानाची आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे आणि कपाळावर केशरचा टिळा लावावा.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
