TRENDING:

फक्त 20 रुपयांत मेजवानी! मुंबईत इथं मिळतेय स्पेशल चायनीज भेळ; लोकांची तुफान गर्दी

Last Updated:

मुंबईकरांच्या स्ट्रीट फूड संस्कृतीत वडापावनंतर जर कोणता पदार्थ पटकन लोकप्रिय झाला असेल, तर तो म्हणजे चायनीज भेळ. साधारण 2004-05 सालापासून मुंबईच्या गल्ल्यांमध्ये दिसू लागलेली ही डिश आजही तितकीच लोकप्रिय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईकरांच्या स्ट्रीट फूड संस्कृतीत वडापावनंतर जर कोणता पदार्थ पटकन लोकप्रिय झाला असेल, तर तो म्हणजे चायनीज भेळ. साधारण 2004-05 सालापासून मुंबईच्या गल्ल्यांमध्ये दिसू लागलेली ही डिश आजही तितकीच लोकप्रिय आहे. झटपट तयार होणारी, चटपटीत आणि परवडणारी असल्यामुळे चायनीज भेळने तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांची मने जिंकली आहेत.
advertisement

जोगेश्वरी-पूर्व येथील इंदिरानगर भागात, साई केमिस्टसमोर असलेले ‘कदम स्नॅक्स कॉर्नर’ सध्या चायनीज भेळप्रेमींसाठी खास आकर्षण ठरत आहे. सिद्धेश कदम या तरुणाने सुरू केलेल्या या छोट्या स्नॅक्स शॉपमध्ये चायनीज भेळला एक वेगळाच स्वाद देण्यात आला आहे.

1972 पासून फेमस ठाकूर वडापाव; पाहा यांच्या युनिक चवीचं गुपित काय?

पूर्वी केवळ 5 रुपयांना मिळणारी चायनीज भेळ आज 20  रुपयांपर्यंत पोहोचली असली, तरी तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट, वेळेनुसार या पदार्थात अनेक नवे प्रकार आले आहेत. ‘कदम स्नॅक्स कॉर्नरमध्ये' गरमागरम हॉट चायनीज भेळ खास पद्धतीने तयार केली जाते. किसलेला कोबी, भेळची शेव, सोया सॉस आणि चिली सॉस एकत्र करून कढईत मध्यम आचेवर गरम केले जाते. त्यानंतर त्यावर मयॉनीज आणि सेझवान सॉस घालून ही भेळ खवय्यांसमोर दिली जाते.

advertisement

या गरम आणि झणझणीत भेळीचा प्रत्येक घास खाणाऱ्याला वेगळाच अनुभव देतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. हे शॉप दररोज दुपारी 4:30 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत सुरू असते.

चायनीज भेळसोबतच येथे मंच्युरियन हॉट चायनीज भेळ, मंच्युरियन पेरी-पेरी चायनीज भेळ, व्हेज मंच्युरियन, व्हेज सूप आणि मंच्युरियन सूप असे विविध चायनीज पदार्थही उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ भेळच नव्हे, तर संपूर्ण चायनीज स्ट्रीट फूडचा आस्वाद एका ठिकाणी घेता येतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फक्त 20 रुपयांत मेजवानी! मुंबईत इथं मिळतेय स्पेशल चायनीज भेळ; लोकांची तुफान गर्द
सर्व पहा

स्वच्छता, चव आणि परवडणारी किंमत यामुळे ‘कदम स्नॅक्स कॉर्नर’ अल्पावधीतच परिसरातील खवय्यांची पसंती मिळवत आहे. चायनीज भेळचा हटके स्वाद अनुभवायचा असेल, तर जोगेश्वरीतील हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
फक्त 20 रुपयांत मेजवानी! मुंबईत इथं मिळतेय स्पेशल चायनीज भेळ; लोकांची तुफान गर्दी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल