advertisement

स्टायलिश चिकनकारी कुर्ती, अवघ्या 300 रुपयांत करा खरेदी, मुंबई हे बेस्ट ठिकाण

Last Updated:

या स्टॉलवर अवघ्या 300 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कमी दरात उत्तम दर्जाचे कपडे मिळत असल्यामुळे महिलांमध्ये या स्टॉलला विशेष पसंती मिळत आहे.

+
दादरमध्ये

दादरमध्ये स्वस्तात स्टायलिश चिकनकारी कुर्त्यांची पर्वणी!

मुंबई : दादर परिसरात सध्या एका खास स्टॉलने खरेदीदारांचे लक्ष वेधून घेतले असून येथे उसळलेली गर्दी चर्चेचा विषय ठरत आहे. कारण बाजारात साधारणतः 1000 ते 1200 रुपयांना मिळणारे आकर्षक आणि फॅशनेबल चिकनकारी कुर्ते या स्टॉलवर अवघ्या 300 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कमी दरात उत्तम दर्जाचे कपडे मिळत असल्यामुळे महिलांमध्ये या स्टॉलला विशेष पसंती मिळत आहे.
या स्टॉलवर विविध रंगसंगती, नक्षीदार डिझाइन्स आणि आधुनिक पॅटर्न्सचे कुर्ते उपलब्ध असून सणासुदीच्या काळात खरेदीसाठी येथे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तरुणींपासून गृहिणींपर्यंत अनेक महिला येथे आवर्जून भेट देत आहेत. येथे लाँग कॉटन कुर्ते केवळ 500 रुपयांना उपलब्ध असून त्यामध्ये विविध रंगांचे आकर्षक पर्याय पाहायला मिळतात.
advertisement
तसेच शॉर्ट कुर्ते फक्त 300 रुपयांपासून उपलब्ध असून त्यातही अनेक रंगसंगती ग्राहकांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व कुर्त्यांमध्ये M साइजपासून 6XL आणि 7XL पर्यंतचे साइजेस उपलब्ध असल्याने प्रत्येक वयोगटातील आणि शरीरयष्टीतील महिलांना येथे योग्य पर्याय मिळत आहे.
याशिवाय कुरेशिया पॅटर्नचे कुर्तेही 500 रुपयांना उपलब्ध असून त्यातही विविध रंग आणि साइजेस आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे 150 ते 250 रुपयांपर्यंत उपलब्ध असून त्यासोबत लखनवी पँटही केवळ 500 रुपयांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण पेहराव एकाच ठिकाणी आणि परवडणाऱ्या किमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.
advertisement
हा स्टॉल दादर पूर्व भागात, साधना हॉटेलसमोर आणि आर्या फॅब्रिकच्या शेजारी आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कमी दरात फॅशनेबल कपड्यांची खरेदी करण्यासाठी हा स्टॉल एक उत्तम पर्याय आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
स्टायलिश चिकनकारी कुर्ती, अवघ्या 300 रुपयांत करा खरेदी, मुंबई हे बेस्ट ठिकाण
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement