गुरू पर्वताचे हातावरील स्थान - तर्जनी बोटाच्या मुळाशी आणि मंगळ पर्वताच्या वरच्या बाजूला गुरू पर्वताचे स्थान असते. या पर्वताच्या उठावावरून व्यक्तीचे गुण आणि भविष्यातील प्रगती याबद्दल माहिती मिळते. जर हातावरील गुरु पर्वत अधिक उठावदार आणि स्पष्ट असेल, तर अशा व्यक्ती जीवनात खूप प्रगती करतात. हे लोक स्वाभिमानी, बुद्धिमान आणि समाजात प्रतिष्ठित असतात. ते स्वतः प्रगती करतातच, पण इतरांनाही प्रगतीचा मार्ग दाखवतात. कठीण प्रसंगात हे लोक धैर्याने वागतात. अशा व्यक्ती अनेकदा उच्च पदावर किंवा न्यायदान क्षेत्रात कार्यरत असतात.
advertisement
गुरु पर्वताचा मध्यम उठाव - ज्यांच्या हातावर गुरु पर्वत मध्यम स्वरूपात विकसित असतो, अशा व्यक्ती जीवनात चांगली प्रगती साधतात. हस्तरेखाशास्त्रानुसार, अशा लोकांचे विवाह लवकर होतात आणि त्यांचे गृहस्थ जीवन सुखी असते. याउलट, ज्यांच्या हातावर हा पर्वत खूप कमी विकसित असतो, त्यांच्यासाठी आत्मसन्मान फारसा महत्त्वाचा नसतो आणि पालकांसोबत त्यांचा वेळ कमी व्यतीत होतो.
गुरू पर्वताचा शनी पर्वताकडे कल - गुरू पर्वत शनी पर्वताकडे झुकलेला असेल, तर अशा व्यक्ती नेहमी कामात व्यस्त असतात, परंतु त्यांना अपेक्षित यश मिळण्यास अडचणी येतात. यामुळे त्यांच्या मनात अनेकदा निराशा निर्माण होते. हे लोक गंभीर स्वरूपाचे असले तरी स्वभावाने काहीसे हट्टी असू शकतात. जर हा पर्वत थोडा खाली दबलेला असेल, तर जीवनात संघर्षाचे प्रमाण वाढते, मात्र अशा व्यक्ती साहित्यात चांगली कामगिरी करू शकतात.
प्रमोशन फिक्स, सरकारी कामात यश; 14 जानेवारीला सूर्य गोचराचा 6 राशींना लाभ
गुरू पर्वत अजिबात न दिसणे - हातावर गुरू पर्वत अत्यंत कमी किंवा न दिसण्याचा अर्थ ती व्यक्ती आनंदी स्वभावाची आहे. असे लोक कोणालाही आपल्याकडे आकर्षित करू शकतात. ते दयाळू असतात आणि त्यांच्यासाठी मान-सन्मान खूप महत्त्वाचा असतो. हे लोक आपले अधिकार कधीही सोडत नाहीत.
गुरु आणि शनी पर्वत समान असणे - गुरू आणि शनी पर्वत समपातळीवर असतात किंवा एकमेकांना मिळतात, तेव्हा ती व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते. अशा व्यक्ती जीवनात सर्वोच्च शिखरावर पोहोचतात आणि त्यांना मोठ्या यशाची प्राप्ती होते. त्यांना आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मात्र, गुरू पर्वत प्रमाणाबाहेर उठावदार असेल, तर अशी व्यक्ती केवळ स्वतःचाच विचार करणारी असते.
धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; जानेवारी महिना कोणासाठी लकी?
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
