TRENDING:

Astrology: तळहात बघा, शनिपर्वतावर 'असा' डाग असणारे नशीबवान; कमी वयात मोठं साम्राज्य उभा राहतं

Last Updated:

Shani Astrology: शनिची कृपा राखण्याचा लोक प्रयत्न करतात. शनिची कृपा राहण्यासाठी फार वेगळं करण्याची गरज नाही, नियत चांगली ठेवली तरी शनी पावतो. म्हणूनच वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्मफळ देणारा मानले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शनी म्हटलं की अनेकांना साडेसाती शब्द आठवल्याशिवाय राहत नाही. शनिची कृपा राखण्याचा लोक प्रयत्न करतात. शनिची कृपा राहण्यासाठी फार वेगळं करण्याची गरज नाही, नियत चांगली ठेवली तरी शनी पावतो. म्हणूनच वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्मफळ देणारा मानले जाते. हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, तळहातावरील शनी पर्वत एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित गुपितं सांगू शकतो.
News18
News18
advertisement

शनी पर्वत शुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला शनीकडून विशेष आशीर्वाद मिळतात. परिणामी, त्या व्यक्तीला आपल्या नोकरी किंवा व्यवसायात कोणत्याही अडचणी येत नाहीत. अशा व्यक्तींना प्रगतीतही कोणत्या अडचणी येत नाहीत. शिवाय, तळहातावरील शनी पर्वतावरून एखाद्या व्यक्तीच्या जीवनात शनीचा राजयोग आहे की नाही हे देखील समजतं. तळहातावर शनी पर्वत कोठे असतो आणि त्याच्याशी संबंधित शुभ खुणा कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

advertisement

असा शनी पर्वत म्हणजे राजयोग -

हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, तळहातावरील शनी पर्वत मधल्या बोटाच्या अगदी खाली असतो. मधल्या बोटाला शनी बोट असेही म्हटले जाते, म्हणूनच त्याच्या खालील उंचवटा असलेल्या भागाला शनी पर्वत म्हटले जाते. हस्तसामुद्रिकांनुसार, जर शनीचे बोट (मधले बोट) सरळ, लांब, मजबूत असेल, तर ते सुदैवाचे लक्षण आहे. ज्यांच्या तळहातावर असा शनी पर्वत असतो, ते त्यांच्या कठोर परिश्रमाने मोठे यश मिळवतात. शिवाय तळहातावरील असा शनी पर्वत राजयोगाचेही लक्षण आहे. ज्यांच्या तळहातावर असा शनी पर्वत असतो, ते त्यांच्या आयुष्यात राजयोगाचे सुख आणि समृद्धी अनुभवतात. तथापि, जर तळहातावरील शनी पर्वत दबलेला असेल अशुभ मानले जाते. ज्यांच्या तळहातावर असा शनी पर्वत असतो, ते जीवनाच्या प्रत्येक वळणावर अथकपणे संघर्ष करतात. अशा लोकांचे आयुष्य संघर्षातच व्यतीत होते. त्या व्यक्तीने आपला स्वभाव बदलून कर्म चांगली करायला पाहिजेत.

advertisement

धडाधड गुडन्यूज! खरा ठरणार अंदाज; या 4 राशींचे नशीब एप्रिलमध्येच पालटण्याचे योग

शनीचा कर्माशी एक विशेष संबंध - शास्त्रानुसार, शनी देवाला नऊ ग्रहांपैकी एक सेवक मानले जाते. त्यांना कठोर परिश्रमाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी गरिबांची सेवा करण्याचा सल्ला दिला जातो. जे लोक गरीब मजुरांचा छळ करतात, त्यांचे शोषण करतात किंवा त्यांना इतर प्रकारे त्रास देतात, त्यांना शनीच्या कोपाला सामोरे जावे लागते. शनी क्रोधित होतो, तेव्हा नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या निर्माण होतात. शनी देवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी, गरीब मजुरांना अन्नदान आणि त्यांना कपडे भेट द्यावीत.

advertisement

वाईटावर टपलेल्यांच्या मनासारखं..! पैसेवाला ग्रह या राशींची साथ सोडणार, बिकट काळ आला

शनी दोष कसा दूर करावा?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिकारीचे हत्यार तयार करणारे हात जेव्हा हार्मोनियम, तबला तयार करू लागले, मिरजकर म्युझिकल्सची कहाणी
सर्व पहा

सध्या अनेक लोक शनीच्या साडेसाती आणि अडीचकीमुळे त्रास होत आहे. साडेसाती-अडीचकीची अशुभ परिणाम कमी करण्यासाठी, तळहाताच्या मधल्या बोटात घोड्याच्या नालाच्या आकाराची अंगठी घाला. दारावर घोड्याचा नाल लावल्याने शनीशी संबंधित समस्या दूर होतात. रत्नशास्त्रातही शनी दोष दूर करण्यासाठी विशिष्ट रत्नांचा उल्लेख आहे. रत्नशास्त्रानुसार, ज्योतिषांचा सल्ला घेऊन नीलम रत्न धारण केल्याने शनिदोषाची झळ कमी बसते.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astrology: तळहात बघा, शनिपर्वतावर 'असा' डाग असणारे नशीबवान; कमी वयात मोठं साम्राज्य उभा राहतं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल