मुंबई : वैदिक पंचांगानुसार, आज दिनांक 21 सप्टेंबर 2025, रविवारचा दिवस हा अत्यंत खास मानला जात आहे. आजचा दिवस खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण आजच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहण एकत्र आले आहे. अशा विशेष संयोगामुळे ग्रहांची हालचालही प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे आजचा दिवस सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करणारा असेल. काहींना शुभ फल मिळेल, तर काहींना आव्हाने स्वीकारावी लागतील. चला तर जाणून घेऊया आजचे 12 राशींचे भविष्य.
advertisement
मेष : आजचा दिवस महिलांसाठी खास प्रेरणादायी ठरेल. तुमच्यातील ध्येयवादी वृत्ती उफाळून येईल. अडचणींवर मात करण्यासाठी तुमची बुद्धी आणि कल्पकता उपयोगी पडेल.
वृषभ : आज तुमच्यासमोर अनेक पर्याय उभे राहतील. मात्र, त्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. कठोर परिश्रम केल्यासच योग्य यश मिळेल.
मिथुन : मानसिक तणाव वाढवणारे प्रसंग उद्भवू शकतात. तरीही, धीर न सोडता पुढे चालत राहिल्यास यश नक्की मिळेल. आत्मविश्वास हीच तुमची खरी ताकद ठरेल.
कर्क : व्यवसायात मोठ्या गुंतवणुकीची शक्यता आहे. घरातील लोकांचे सहकार्य थोडे उशिराने मिळेल, पण शेवटी पाठिंबा नक्की मिळेल.
सिंह : प्रकृतीच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः यंत्रसामग्री व अग्नीशी संबंधित काम करणाऱ्यांनी अधिक सतर्क राहावे.
कन्या : आज पैसे उसने देणे किंवा कोणासाठी जामीन राहणे टाळावे. अन्यथा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तूळ : संततीसंदर्भात काही काळजी निर्माण होईल. मात्र आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. नियोजनाने दिवस चांगला जाईल.
वृश्चिक : कामातील अनेक प्रश्न सुटतील. घरगुती समस्यांना शांतपणे तोंड द्याल. धीर व संयम या दोन्ही गुणांमुळे यश मिळेल.
धनु : नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या नवीन योजनांना त्यांची दाद मिळेल. पदोन्नती किंवा प्रगतीची शक्यता आहे.
मकर : परदेश प्रवासाच्या संधी निर्माण होतील. सर्व कामे एकट्याने करणे शक्य होणार नाही, त्यामुळे इतरांवर विश्वास ठेवावा लागेल.
कुंभ : महिलांचा घरामध्ये जास्त वेळ जाईल. नोकरी-व्यवसायात परिश्रम अधिक आणि समाधान कमी मिळेल. संयम राखणे आवश्यक आहे.
मीन : व्यवसायात स्पर्धा तीव्र होईल. प्रतिस्पर्ध्यांना तोंड देण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. थकवा जाणवेल, परंतु प्रयत्न व्यर्थ ठरणार नाहीत.
एकूणच, 21 सप्टेंबर 2025 हा दिवस सूर्यग्रहण आणि सर्वपित्री अमावस्येमुळे विशेष ठरला आहे. आज काही राशींना यश मिळणार असले तरी काहींना सावधगिरीने पाऊल टाकावे लागेल.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)