'या' 3 राशींचं नशीब उजळणार
मेष: आर्थिक प्रगती आणि यश
मेष राशीच्या जातकांसाठी केतूचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. अडकलेले पैसे परत मिळतील आणि पदोन्नतीचे प्रबळ योग आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील.
कन्या: अचानक धनलाभ
advertisement
कन्या राशीच्या लोकांसाठी हे गोचर वरदान ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित मार्गाने धनलाभ होऊ शकतो. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. करिअरमध्ये घेतलेले धाडसी निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरतील.
मकर: पद-प्रतिष्ठा आणि प्रगती
मकर राशीसाठी केतूचे हे संक्रमण लाभदायक ठरेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. विवाहासाठी इच्छुकांना चांगले प्रस्ताव येऊ शकतात.
'या' 3 राशींना राहावे लागेल सावध
मिथुन: मानसिक तणाव आणि अडथळे
मिथुन राशीसाठी बनत आलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडू शकतात. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात गुंतवणुकीपासून लांब राहावे आणि आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
तूळ : आर्थिक झटके
उत्पन्नात घट होण्याची आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात दुरावा किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महाग पडू शकते. कौटुंबिक बाबींमध्ये शांत राहणे हिताचे ठरेल.
मीन: कामात विलंब आणि नुकसान
कामात वारंवार अडथळे येतील, ज्यामुळे मनात नैराश्य येऊ शकते. प्रवासादरम्यान सामानाची चोरी किंवा नुकसान होण्याची भीती आहे. जोडीदाराच्या आरोग्यामुळे चिंता वाढू शकते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
