पोटावर (पालथं) झोपणारे -
काही लोकांना पालथं झोपण्याची सवय असते. त्याशिवाय त्यांना शांत झोपू शकत नाहीत. पालथं झोपणं ही एक सामान्य पोजिशन मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक पोटावर झोपतात ते सोशल आणि अतिशय मनमिळावू असतात. कामाच्या ताणामुळे हे लोक थोडे हतबल होतात. त्यांना स्वतःची टीका ऐकणे आणि इतरांवर टीका करणे आवडत नाही. हे लोक स्वतःला आतून असुरक्षित समजतात. पोटावर झोपण्याचे वैज्ञानिक कारण असे आहे की ते मानेच्या दुखापतींना प्रोत्साहन देते आणि गर्भवती महिलांसाठी हानिकारक असू शकते.
advertisement
डोक्याखाली हात ठेवून झोपणे -
अनेकांना हाताची उशी बनवून झोपायला आवडते. अशा लोकांच्या मैत्रीवर विश्वास ठेवायला हरकत नाही. या लोकांचे व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक असते. बहुतेक लोक यांच्या स्वभावाने आणि शब्दांनी खूप लवकर आकर्षित होतात.
उशी घेऊन झोपणे -
उशी घेऊन झोपण्याची सवय महिलांमध्ये जास्त असते. जर त्यांच्याकडे उशी नसेल तर त्या त्यांच्या मानेखाली टेडी बेअर घेऊन झोपतील. अशा महिला आनंदी स्वभावाच्या असतात. त्या त्यांच्या नात्याला खूप महत्त्व देतात. त्या सर्व कामे स्वतः करतात. जोडीदार त्यांच्या सर्व गरजा हळूहळू पूर्ण करतो. त्या इतरांसाठीदेखील उपयुक्त आहेत. अशा लोकांना त्या ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांची चांगली काळजी कशी घ्यावी हेदेखील माहिती असते. हे गुण स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखेच लागू होतात.
देव आणि राक्षस गणाच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये? सर्वोत्तम जीनसाथी कोणता
पाय मुरगळुन झोपणे (गर्भाच्या स्थितीत) -
काही लोकांना पाय लोकांना गर्भासारखे झोपायला आवडते. असे मानले जाते की, जो या स्थितीत झोपतो तो आपल्या जीवनात आराम आणि सुरक्षितता शोधत राहतो. जर एखादी व्यक्ती या स्थितीत झोपत असेल तर तो एक अतिविचारी व्यक्ती आहे, जो खरोखर खूप संवेदनशील असू शकतो.
सरळ वरती तोंड करून झोपणे -
जे लोक सरळ झोपतात ते आदर्शवादी असतात आणि शिस्तीचे पालन करतात. सैनिकाप्रमाणे सरळ मुद्रेत झोपणारे बरेच लोक आहेत. हे लोक अतिशय कठोर आणि सावध व्यक्तिमत्त्वाचे आहेत. झोपेत अशा प्रकारे झोपणे हे लष्करी जवानासारखे मानले जाते. याचा अर्थ तुम्ही तुमचे जीवन गांभीर्याने घेत आहात आणि तुमचे जीवन योग्य दिशेने जगण्यासाठी खूप अपेक्षा आहेत.
साध्या गोष्टीवरही एकमत होणं मुश्कील! या जन्मतारखांची जोडी सहजीवनात 'जेमतेम'
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)