श्रवण नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी एक असून त्याचा स्वामी ग्रह चंद्रमा आहे. चंद्राच्या प्रभावामुळे या नक्षत्रातील लोक भावनिक, संवेदनशील आणि मनाचे ऐकणारे असतात. त्यांचे आईसोबतचे नाते खूप घट्ट असते. हे नक्षत्र मकर राशीमध्ये येते, ज्या राशीचा स्वामी शनी आहे. शनीचा प्रभाव या लोकांना मेहनती, शिस्तप्रिय आणि जबाबदार बनवतो. या नक्षत्राचे दैवत भगवान विष्णू असल्याने या व्यक्तींमध्ये संयम, धैर्य आणि योग्य मार्गाने चालण्याची वृत्ती दिसून येते.
advertisement
श्रवण नक्षत्रातील व्यक्तींचा स्वभाव - या नक्षत्रात जन्मलेले लोक ज्ञानी असतात आणि त्यांच्यात सतत काहीतरी नवीन शिकण्याची ओढ असते. ते कष्टाला घाबरत नाहीत आणि याच जिद्दीमुळे आयुष्यात यश संपादन करतात. इतरांना संकटात पाहून हे लोक मदतीसाठी धावून जातात. एकाच वेळी अनेक कामे हाताळण्याचे कौशल्य (मल्टीटास्किंग) त्यांच्यात उत्तम असते. त्यांची देवावर आणि अध्यात्मावर गाढ श्रद्धा असते. हे लोक स्वच्छतेचे भोक्ते असून शिस्तबद्ध आयुष्य जगणे त्यांना आवडते. एकदा घेतलेला निर्णय ते सहजासहजी बदलत नाहीत.
करिअर आणि आर्थिक स्थिती - श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना सहसा 30 वर्षांनंतर करिअरमध्ये स्थिरता मिळते. सुरुवातीच्या काळात त्यांना खूप कष्ट करावे लागतात, परंतु त्याचे फळ त्यांना उशिरा का होईना पण चांगले मिळते. आयात-निर्यात, वाहतूक (ट्रान्सपोर्ट), इंजिनिअरिंग आणि पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित कामे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय अध्यापन, संगीत, गायन, समुपदेशन (काउंसलिंग) आणि प्रशिक्षण देण्याच्या कामातही हे लोक नाव कमावू शकतात. जिथे ज्ञान वाटण्याची किंवा मार्गदर्शन करण्याची गरज असते, तिथे हे लोक अधिक यशस्वी होतात.
प्रत्येक महिन्याला शिवरात्री असते मग महाशिवरात्री का साजरी करतात? बरोबर उत्तर...
प्रेम आणि वैवाहिक जीवन - हे लोक आपल्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतके मग्न होतात की, कधीकधी त्यांना कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण जाते. यामुळे नात्यात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रेमात या लोकांना दिखावा आवडत नाही, तर मनापासूनचे नाते जपण्यावर त्यांचा भर असतो. या नक्षत्रातील स्त्रिया आपल्या पतीवर आणि कुटुंबावर खूप प्रेम करतात आणि घर सावरून धरण्यासाठी मेहनत घेतात. जर त्यांनी कामातून वेळ काढून नात्याला दिला, तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि स्थिर राहते.
टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
