नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या -
पिंढीवर कच्चे दूध अर्पण करा- नाग पंचमीच्या दिवशी महादेवाच्या पिंढीवर कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे कुंडलीत असलेल्या कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होऊ लागतो. यासोबतच भोलेनाथ जीवनात सकारात्मक बदल देखील दाखवतात.
शिवलिंगावर धतूरा अर्पण करा - महादेवाला धतूरा खूप प्रिय असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे नाग पंचमीच्या शुभप्रसंगी आपण शिवलिंगावर धतूरा अर्पण केला पाहिजे. शिवलिंगावर धतूरा अर्पण केल्यानं आजारांपासून सुटका मिळते, तसेच आर्थिक बाजूही भक्कम होते.
advertisement
काळे तीळ - काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण केल्यानं कालसर्प दोषाचा प्रभाव संपतो. लगेच आपल्या जीवनात त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येतात. यासाठी नाग पंचमीच्या शुभ प्रसंगी शिवलिंगावर तीळ अर्पण केले पाहिजे.
दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशींना भयंकर त्रास देणार
नाग पंचमीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास भोलेनाथ आपल्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतात. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानं कालसर्प दोष देखील प्रभावहीन होतो. यानं कौटुंबिक जीवनात समृद्धी येते. यासोबतच, मानसिक समस्या दूर करण्यासाठी शिवलिंगावर बेलपत्र देखील अर्पण करावे.
अक्षर-चंदन अर्पण केल्यानं जीवनात स्थिरता - भगवान शिव आणि नाग देवता यांना प्रसन्न करण्यासाठी, नाग पंचमीच्या दिवशी शिवलिंगावर अक्षत आणि चंदन देखील अर्पण करावे. अक्षता आपल्या आयुष्यात समृद्धी आणतात, तर चंदन घरात आणि कुटुंबात शांती आणि स्थैर्य मिळवून देतं.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
