Shani Vakri 2025: शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Vakri 2025: शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे आणि तो एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी घेतो. तो वर्षातून सुमारे १३८ ते १५० दिवस वक्री असतो.
शनीला न्याय आणि कर्माचा कारक मानले जाते. तो व्यक्तीला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ देतो. जेव्हा शनी वक्री होतो, तेव्हा त्याचा परिणाम अधिक तीव्रतेने आणि कधीकधी अनपेक्षितपणे जाणवतो. शनी वक्री असताना व्यक्तीला तिच्या भूतकाळातील कर्मांचे फळ जास्त तीव्रतेने भोगावे लागते. जर कर्म चांगले असतील तर शुभ परिणाम मिळतात, तर वाईट कर्मांसाठी अडचणी वाढू शकतात.
advertisement
advertisement
कन्या - शनीच्या वक्री गतीमुळे कन्या राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या काळात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, त्यामुळं जीवनातील अनेक आव्हानांवर सहज मात कराल. या काळात काही लोकांच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचारही येईल आणि हा विचारही मूर्त स्वरूप धारण करू शकतो. प्रवास आनंददायी असतील, तुम्हाला प्रवासातून लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. धार्मिक कार्य करून तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
advertisement
वृश्चिक - शिक्षण क्षेत्रात तुम्हाला ज्या समस्या येत होत्या त्या आता दूर होऊ शकतात. तुम्ही एकाग्र राहाल आणि प्रत्येक काम वेळेवर पूर्ण कराल. पालकांच्या पाठिंब्याने तुम्ही नोकरी आणि व्यवसायात प्रगती कराल. तुम्ही आर्थिकदृष्ट्याही भक्कम असाल, काही लोकांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात. तुम्ही सरकारी क्षेत्रात नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते.
advertisement
मकर - शनि तुमच्या राशीचा स्वामी असून तुमच्या तिसऱ्या भावात वक्री होईल. शनि वक्री असल्यानं तुमचं धैर्य वाढेल. या काळात तुम्ही आव्हानांवर मात करून उंची गाठू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि सहकाऱ्यांमध्ये तुमचे चांगले काम प्रसिद्ध होऊ शकते. तुम्ही कौटुंबिक जीवनात चांगला वेळ घालवू शकता, या काळात कुठेतरी प्रवास करण्याची योजना देखील बनेल. आर्थिक लाभाची शक्यता देखील आहे.
advertisement
मीन - शनि वक्री असल्यानं तुमच्यासाठीही फायदेशीर ठरेल. तुम्हाला अचानक काही लाभ मिळू शकतात. या काळात केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला फायदाही होईल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध असाल. या राशीच्या लोकांना आरोग्यातही चांगले बदल दिसू शकतात. या काळात तुम्हाला प्रेम आणि वैवाहिक जीवनातही चांगले बदल दिसतील. काही लोकांचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)