TRENDING:

Numerology: कुणाची साथ नव्हती, नशिबानं जुळून आलं सर्व! या 3 मूलांकाच्या प्रगतीची दारे उघडली

Last Updated:

Numerology: अंकशास्त्रानुसार प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व असते. शनिवारचा दिवस अंकशास्त्र अंकशास्त्रानुसार कसा असेल, याविषयी ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ. शनिवार पैसा आणि प्रगतीसाठी चांगला असला तरी, नात्यांमध्ये समजदारपणा दाखवणं गरजेचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

तुम्ही कितीही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तरी घरगुती वातावरणात थोडी धुसफूस राहू शकते. आज तुमचा कल वाचन-लेखनाकडे जास्त असेल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, कोणीतरी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतं. आज सहज पैसा मिळेल, पण तो उधळण्यापेक्षा भविष्यासाठी वाचवून ठेवा. एखादी खास व्यक्ती आज तुमच्यासाठी काहीतरी गोड करेल.

लकी नंबर: 22, लकी कलर: डार्क ग्रे

advertisement

अंक 2 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे)

आज तुम्ही समाजसेवेच्या कामात स्वतःला झोकून द्याल. तुमचं व्यक्तिमत्त्व आज लोकांना आकर्षित करेल. एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती आहे, त्यामुळे सावध राहा. ऑफिसमध्ये लोकांसोबत होणाऱ्या कुरबुरींमुळे थोडा ताण येऊ शकतो. आज तुमचं मन थोड्या गमतीशीर मूडमध्ये असेल, पण मर्यादा ओलांडू नका.

advertisement

लकी नंबर: 8, लकी कलर: पोपटी

अंक 3 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे)

लोकांशी फटकून वागल्यामुळे तुमच्या नात्यांवर परिणाम होऊ शकतो. रागावर ताबा मिळवण्यासाठी आज तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. कोणत्याही वादात पडू नका, त्याचे परिणाम वाईट होतील. शेअर मार्केटमधून आज तुम्हाला चांगला नफा मिळण्याचे योग आहेत. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस एकदम भारी आहे.

advertisement

लकी नंबर: 5, लकी कलर: गडद हिरवा

अंक 4 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे)

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आज तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. स्वतःची कल्पकता कशी वाढवता येईल याचं नियोजन करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. औषधपाण्यावर खर्च वाढू शकतो, पण तो तुमच्या स्वतःच्या आजारपणासाठी नसेल. धंद्यातल्या अडचणींमुळे थोडं अस्वस्थ वाटेल. रोमँटिक आयुष्यात आज काहीतरी खास घडण्याची शक्यता आहे.

advertisement

लकी नंबर: 15, लकी कलर: लाल

आलीच ती वेळ! 13 मार्चला शनिदेव पुन्हा अस्ताला; या राशींची साडेसाती सुटल्यात जमा

अंक 5 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला आहे)

पैसा, प्रसिद्धी आणि यश हे सगळं आज तुमच्या वाट्याला येईल. आज तुमची पहिली पसंती फक्त मनोरंजनाला असेल. जर गाडी घेण्याचा विचार असेल तर आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्ये आज मोठी वाढ दिसून येईल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, यामुळे तुमची नाती अजून सुधारतील.

लकी नंबर: 3, लकी कलर: कॉफी

अंक 6 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे)

एका छोट्या गैरसमजामुळे मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात, जे सोडवायला वेळ लागेल. दिवसभर मनामध्ये थोडं असमाधान राहील. शत्रूंपासून सावध राहा, कदाचित ते तुमच्या जवळचेच लोक असू शकतात. या काळात पैशांचा ओघ बाहेर जास्त असेल. जोडीदाराशी कडाक्याचं भांडण होऊ शकतं, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा.

लकी नंबर: 9, लकी कलर: गोल्डन ब्राऊन

अंक 7 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला झाला आहे)

सरकारी कामांमध्ये कागदपत्रांच्या गोंधळामुळे थोडा उशीर होऊ शकतो. स्वतःच्या कौशल्यात भर घालण्यासाठी प्लॅनिंग करा. खूप दिवसांपूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज अचानक परत मिळेल. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आजचा दिवस लय भारी आहे. प्रेमाच्या बाबतीत दिवस थोडा शांत असेल, संध्याकाळी जोडीदाराला कुठे बाहेर नेऊन सरप्राइज द्या.

लकी नंबर: 3, लकी कलर: क्रीम

अंक 8 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे)

तुम्ही तुमच्या कल्पकतेला वाट करून देण्यासाठी धडपडाल. स्पर्धेकडे दुर्लक्ष करू नका, गाफील राहणं महागात पडू शकतं. त्वचेची काही तक्रार असेल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. मेहनतीच्या मानाने आज फायदा थोडा कमी वाटेल. लग्नाची तारीख पक्की होण्याची किंवा त्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

लकी नंबर: 7, लकी कलर: सिल्व्हर

मनी प्लांट ओके! पण वास्तुनुसार ही वनस्पतीसुद्धा लाभदायी; योग्य दिशेला लावल्यास..

अंक 9 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला झाला आहे)

कुटुंबासोबतच्या नात्यात आज थोडा तणाव जाणवेल. दिवसभर चैनीच्या वस्तू हव्याहव्याशा वाटतील. तुमची ऊर्जा आज शिखरावर असेल, त्यामुळे तुम्ही दिवसभर कामात मग्न राहाल. मेहनतीचं फळ मिळेल आणि करिअरमध्ये यश येईल. प्रेमाच्या बाबतीत आज तुम्हाला एखादं छान सरप्राइज मिळू शकतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

लकी नंबर: 18, लकी कलर: लाल

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: कुणाची साथ नव्हती, नशिबानं जुळून आलं सर्व! या 3 मूलांकाच्या प्रगतीची दारे उघडली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल