कोल्हापूर : मानवी जीवनात अंकांना खूप महत्त्व असतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून मानवी जीवन प्रभावित देखील करत असतात. लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. नवं वर्ष सुरू होणार म्हटलं की अनेकांना हे वर्ष आपल्यासाठी कसं असणार? हे जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे अनेकजण राशी किंवा अंक ज्योतिषाच्या माध्यमातून भविष्य जाणून घेत असतात. सन 2025 हे नवं वर्ष अनेक घटना आणि घडामोडींनी भरलेलं असणार आहे. याबाबत कोल्हापूर येथील अंक ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी माहिती दिलीये.
advertisement
2025 वर्षावर मंगळाचा प्रभाव
आगामी वर्ष सन 2025 हे मंगळाचं वर्ष म्हणून ओळखलं जाणार आहे. कारण 2025 ची अंकशास्त्रानुसार पूर्ण बेरीज केली तर 9 अंक येतो. 9 या अंकावरती अंकशास्त्रानुसार मंगळाचे प्रभुत्व आहे. नवग्रहामध्ये मंगळ हा सेनापती म्हणून ओळखला जातो. त्यानुसार सेनापती हा युद्धावर जाणारा कर्तव्यपरायण, आत्मविश्वासू, आळस झटकणारा, लढवय्या म्हणून ओळखला जातो. ज्योतिष शास्त्रामध्ये मंगळाला आत्मविश्वासाचे व धाडसाचे प्रतीक मानले गेले आहे. त्यानुसार मनुष्यातील आत्मविश्वास व धाडसावरती मंगळाचा प्रभाव राहतो. त्यामुळे आगामी वर्ष हे व्यक्तींमधील धाडस वाढवणारे, त्यांच्यातील आत्मविश्वास द्विगुणीत करणारे, कोणत्याही कार्यामध्ये पुढाकार घेऊन ते कार्य करण्याची ऊर्जा देणारे असे असेल.
तुमच्या कष्टाचं चीज होणार! 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तींसाठी कसं असेल नवं वर्ष
कसं असेल 2025 हे वर्ष?
2025 हे वर्ष सर्व अंकांसाठी एक सारखेच फलदायी ठरेल असे नाही. प्रत्येक अंकासाठी हे वर्ष वेगवेगळ्या अंगानी फलदायी ठरेल. कारण येणाऱ्या वर्षाची बेरीज जरी 9 येत असली व 9 हा पूर्णांक असला तरी काही अंकांचा तो मित्र आहे, तर काही अंकांचा तो शत्रू आहे. त्यामुळे या वर्षाचे प्रत्येक अंकांसाठी मिळणारे परिणाम हे भिन्नभिन्न स्वरूपाचे असतील, असे अंक ज्योतिषशास्त्री कदम सांगतात.
प्रचंड उलथापालथ होणार
आगामी वर्षाचा स्वामीग्रह हा मंगळ असल्याने व मंगळ हा युद्धाचा कारक असल्याने नवीन वर्षामध्ये अनेक उलथापालथी होतील. काही ठिकाणी स्फोटक परिस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही मोठ्या अडचणी, वादाचे प्रसंग, संघर्ष निर्माण होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या वर्षात गंभीर परिणामांना देखील सामोरं जावं लागू शकतं. तसेच प्रत्येकाच्या शुभांक, मूलांकानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी हे वर्ष वेगवेगळ्या चढउतारांनी भरलेलं असेल, असंही ज्योतिषशास्त्री कदम यांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.