तुमच्या कष्टाचं चीज होणार! 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तींसाठी कसं असेल नवं वर्ष

Last Updated:

Birth Numerology 2025: येणारे 2025 हे नववर्ष अंकशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ज्यांचा मूलांक 1 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असेल? जाणून घेऊ.

+
तुमच्या

तुमच्या कष्टाचं चीज होणार! 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तींसाठी कसं असेल नवं वर्ष

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : आपल्या जीवनात अंकांना खूप महत्त्व असून ते वेगवेगळ्या पद्धतींनी प्रभावित देखील करत असतात. येणाऱ्या काही दिवसातच 2025 हे नववर्ष सुरू होणार आहे. हे वर्ष आपल्याला कसं जाणार? याची उत्सुकता बऱ्याच जणांना लागून राहिलेली असते. अंकशास्त्राच्या दृष्टीने येणारं नववर्ष कसं असेल? याबाबत लोकल18 च्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कोल्हापुरातील प्रसिद्ध अंक ज्योतिषशास्त्री राहुल कदम हे आपल्याला याबाबत माहिती देणार आहेत. ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 आहे म्हणजेच ज्यांचा मूलांक 1 आहे, अशांसाठी नववर्ष 2025 कसं असेल? जाणून घेऊ.
advertisement
ज्या व्यक्तींची जन्मतारीख एक 10, 19 व 28 ही आहे त्या सर्व व्यक्तींचा मुलांक हा एक हा असेल. 1 हा अंक नवग्रहांपैकी रवी या ग्रहाच्या अंमलाखाली येतो. आगामी येणारे वर्ष हे मंगळाच्या अधिपत्याखाली येणारं आहे. कारण 2025 वर्षाच्या अंकांची संपूर्ण बेरीज केली असता ही बेरीज 9 येते. 9 हा अंक मंगळाला प्रतिनिधित्व करणार असल्याने मंगळ हा ग्रह या वर्षावरती प्रभाव ठेवणार आहे. रवी हा नवग्रहांमधील राजा असून मंगळ हा नवग्रहांमध्ये सेनापती म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राजा व सेनापती या दोघांची जोडी राजकीय क्षेत्रावर प्रभाव टाकणारी राहील.
advertisement
1 मूलांक असणाऱ्यांचा स्वभाव
1 या अंकाचा स्वभाव अतिशय महत्त्वाकांक्षी, कोणाचेही उपकार स्वतःवरती न ठेवणारा, समाजामध्ये पुढाकार घेऊन कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणारा, खोटे बोलणे न आवडणारा, सामाजिक क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्याची आवड असणारा, कोणाचाही अंमल स्वतःवरती न चालवणारा असा ओळखला जातो. 1 या अंकाचा प्रभाव असणारे व्यक्ती किंवा एक हा मूलांक किंवा शुभांक असणाऱ्या व्यक्ती या आपले प्रेम व्यक्त करीत नाहीत. या व्यक्ती प्रेमळ असल्या तरी त्यांना ते व्यक्त करायला जमत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्या प्रेमाबद्दल गैरसमज निर्माण होतात.
advertisement
कष्टाचं चीज होईल
1 अंकाचा स्वामी रवी व 9 अंकाचा स्वामी मंगळ हे दोन्ही परस्परांचे मित्र ग्रह असल्याने किंवा हे एकमेकांचे मित्रांक आहेत. त्यामुळे आगामी 2025 हे वर्ष 1 हा शुभांक किंवा मुलांक असणाऱ्यांसाठी अतिशय शुभकारक जाणार आहे. पण त्याचा अर्थ आपण फक्त हातावर हात धरून बसावे असा नाही. तर याचा अर्थ आपण जे कष्ट कराल त्या कष्टाचे चीज या वर्षात होणार असून कोणतेही कष्ट वाया जाणार नाही, असा असल्याचं ज्योतिषशास्त्री कदम सांगतात.
advertisement
राजकारण्यांसाठी फलदायी
2025 मध्ये 1 या अंकाने आपले जे काही नियोजना असेल ते ठरवावे. आपणास काय हवे आहे व काय करायचे आहे? हे ठरवल्यानंतर या वर्षात त्या गोष्टी पूर्णत्वाला जातील. कारण रवी महत्त्वाकांक्षी ग्रह असला तरी महत्त्वकांक्षा पूर्ण होण्यासाठी आत्मविश्वास, धाडस आवश्यक आहे. आतापर्यंत या बाबी मनासारखी नसल्याने महत्त्वकांक्षा पूर्ण होत नव्हत्या. मात्र आगामी वर्षात 9 या ग्रहाचा म्हणजेच मंगळाचा प्रभाव आहे. मंगळ हा आत्मविश्वासाचा, धाडसाचा, कर्तृत्वाचा ग्रह असल्यामुळे तो 1 या अंकाच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी निश्चितच मदत करेल. तो तेवढा आत्मविश्वास व तेवढे धाडस 1 या अंकामध्ये निर्माण करेल व महत्त्वाकांक्षा पूर्णत्वाला नेण्यासाठी फलदायी ठरेल. राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना हे वर्ष चांगले फलदायक जाईल, असंही ज्योतिषशास्त्री सांगतात.
advertisement
गणपती, मारुतीची उपासना
मंगळासाठी साधारणपणे गणपती व मारुती यांच्या उपासना फलदायी ठरतात. त्यामुळे 1 हा अंक असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्णत्वाला जाण्याकरता व आपली आडलेली कामे पूर्ण होण्यासाठी मारुती किंवा गणपतीची उपासना करणे फलदायी ठरेल. मंगळवारी मारुतीला किंवा गणपतीला जाऊन त्याचे दर्शन घेणे लाभदायक ठरेल. तसेच गणेश स्तोत्र किंवा हनुमान चालीसा वाचणे देखील त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असंही ज्योतिषशास्त्री सांगतात.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
तुमच्या कष्टाचं चीज होणार! 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तींसाठी कसं असेल नवं वर्ष
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement