कोल्हापूर : आपल्या जीवनात अंकांना खूप महत्त्व आहे. अंक हे वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्याला प्रभावित देखील करतात. अंकशास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन देखील करता येतं. येणाऱ्या काही दिवसातच 2025 हे नववर्ष सुरू होणार आहे. अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला यांचा जन्म झाला आहे त्यांचा मूलांक हा 6 असतो. 6 मूलांक असणाऱ्या लोकांसाठी नवं वर्ष कसं जाईल? याबद्दच ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी माहिती दिली आहे.
advertisement
6 मुलांक असणाऱ्या व्यक्तींचं काय आहे वैशिष्ट्य?
अंकशास्त्रानुसार 6 या अंकाचा स्वामी शुक्र हा ग्रह असून शुक्र हा विलासाचा चैनीचा आणि कलेचा कारक म्हणून ओळखला जातो. 6 या अंकाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्ती या आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या भिन्नलिंगी व्यक्तीवरती आपला प्रभाव टाकणाऱ्या असतात. भिन्न लिंगी व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या अशा असतात. यांचे व्यक्तिमत्व हे अतिशय प्रसन्न असते आणि यांना भेटल्यानंतर लोकांना आनंद वाटतो. यांच्या बोलण्यात आणि वागण्यात मोहकपणा, आकर्षकपणा असल्यामुळे लोक यांच्याकडे चटकन आकर्षित होतात. हा अंक सौंदर्य कला सामर्थ्य प्रेम आपुलकी आकर्षणाचा कारक असल्याने या व्यक्तींमध्ये या गोष्टींचा प्रभाव अधिक असल्याचे दिसून येते, असं ज्योतिषशास्त्री कदम सांगतात.
येणार नववर्ष 6 मुलांकसाठी कसं असेल?
2025 या वर्षावरती मंगळ या ग्रहाचा प्रभाव असून शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांची युती झाल्याप्रमाणे यावेळी 6 अंकाच्या लोकांना याची फले प्राप्त होतील. 6 अंक प्रेमाचा तर 9 हा अंक धाडसाचा कारक असल्यामुळे यावेळी प्रेम विवाह अधिकाधिक होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. ज्यांची प्रेमप्रकरणे रखडले असतील किंवा ज्यांना आपल्या प्रेमाची कबुली देता येत नाही ते लोक यावेळी आपल्या प्रेमाची कबुली देऊन मोकळी होतील. जे लोक कलेचे क्षेत्रात काम करतायेत, सिनेनाट्य अभिनय किंवा चित्रकला नाट्यकला नृत्यकला किंवा आर्किटेक्चर इंटिरियर डिझाईन अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये जिथे कल्पकतेला वाव असतो. अशा ठिकाणी या लोकांना यावर्षी चांगलीच प्रगती झाल्याची दिसून येईल, असं ज्योतिषशास्त्री कदम सांगतात.
कोणती उपासना ठरेल फलदायी?
आगामी वर्ष 6 या अंकासाठी शुभ असले तरी छोट्या मोठ्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अडचणीवरती देखील मात करून आपली प्रगती साधून घेण्याकरता 6 अंकाच्या व्यक्तींनी देवीची उपासना करणे फार लाभदायक ठरेल. त्यामध्ये आपली जी कुलदेवता असेल तिची उपासना त्याच पद्धतीने श्री सूक्त सारखी स्तोत्र किंवा सप्तशतीसारखे स्तोत्र वाचायला हरकत नाही. यासोबतच आगामी वर्ष मंगळाचे असल्याकारणाने गणपती आणि मारुती यांची देखील उपासना करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. यावर्षी आपल्या घरामध्ये शुभकार्य घडून येतील जे व्यक्ती कमिशन बेसिसवरती व्यवहार करतायेत. परंतु त्यांचे मोठे व्यवहार अडकलेले आहेत अशा व्यक्तींची व्यवहार यावर्षी मार्गी लागतील आणि त्यांना आर्थिक प्राप्ती चांगल्या पद्धतीने होऊ शकेल, असंही ज्योतिषशास्त्री कदम सांगतात.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.