तुमच्या घरी शनिवारी लहान पाहुण्याचं आगमन झालं असेल, तर त्याच्यासाठी शनिदेवांच्या नावावरून नाव ठेवणं खूपच शुभ मानलं जातं. शनिदेवांच्या नावाचा प्रभाव मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर आयुष्यभर सकारात्मक राहतो.
शनिदेवांची काही निवडक नावं आणि त्यांचे सुंदर अर्थ खालीलप्रमाणे आहेत:
छायापुत्र: शनिदेवांच्या या नावाचा अर्थ आहे- माता छाया यांचा मुलगा. हे नाव मुलाच्या आईसोबतच्या घट्ट नात्याला दर्शवते.
advertisement
अचंचल: याचा अर्थ होतो- जो कधीही डगमगत नाही किंवा जो स्थिर आहे. जीवनात कितीही संकटं आली तरी न डगमगणाऱ्या मुलासाठी हे नाव उत्तम आहे.
नीलवर्ण: शनिदेवांचा आवडता रंग निळा आहे, म्हणून त्यांना नीलवर्ण म्हणजेच निळ्या रंगाचे असे म्हटले जाते.
विधिरूप: ज्यांच्या बोलण्यात पवित्रता आहे आणि जे नेहमी योग्य उपदेश देतात, असा या नावाचा अर्थ होतो.
विश्ववंद्य: संपूर्ण जग ज्यांच्यासमोर नतमस्तक होतं आणि ज्यांची पूजा करतं, असे म्हणजे विश्ववंद्य.
आयुष्यकारण: शनिदेव हे आयुष्याचे कारक मानले जातात. हे नाव मुलाला दीर्घायुष्य देणारा अशा अर्थाने वापरता येते.
विष्णुभक्त: शनिदेव हे भगवान विष्णूंचे मोठे भक्त आहेत. भक्ती आणि श्रद्धा असलेल्या मुलासाठी हे नाव खूप छान आहे.
विरुपाक्ष: ज्यांना अनेक डोळे आहेत किंवा ज्यांची दृष्टी अफाट आहे, असे शनिदेव.
वरिष्ठ: वरिष्ठ म्हणजे सर्वांत थोर किंवा उत्कृष्ट. मुलाच्या भविष्यात तो उच्च स्थानी जावा यासाठी हे नाव प्रेरणादायी ठरेल.
गरिष्ठ: याचा अर्थ होतो अत्यंत आदरणीय आणि सन्माननीय.
श्रेष्ठ: सर्वांमध्ये महान किंवा सर्वांत उच्च असे.
मितभाषिण: आजच्या काळात मोजकं आणि मुद्देसूद बोलणं हा मोठा गुण आहे. मितभाषिण म्हणजे विचार करून आणि कमी बोलणारा.
झालं बाबा.. गेली मोठी साडेसाती! धनशक्ती योग जुळल्याचा 3 राशींना अफाट फायदा
भक्तिवश्य: जे केवळ खऱ्या भक्तीने प्रसन्न होतात आणि भक्ताच्या प्रेमापोटी वश होतात, त्यांना भक्तिवश्य म्हणतात.
धनदा: आपल्या कर्माने प्रसन्न होऊन जे धन-संपत्तीचा आशीर्वाद देतात, त्यांना धनदा म्हणतात.
धनुष्मत: ज्यांचं रूप किंवा शरीर विशेष आकाराचं किंवा धनुष्यासारखं आहे असे.
तामस: ज्यांच्याकडे तामस गुण किंवा शक्ती आहे असे.
दिव्यदेह: ज्यांचं शरीर दिव्य, तेजस्वी आणि दैवी आहे असे.
निरामय: या नावाचा अर्थ आहे जो सर्व रोगांपासून मुक्त आहे, म्हणजेच जो नेहमी निरोगी राहतो.
