राशीचक्रात एकूण 12 राशी आहेत. प्रत्येक राशीसाठी एक वेगळं रत्न सांगितलं आहे. एखाद्या राशीला सातत्याने अडचणी आणि समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर त्यानुसार रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. त्यानुसार मेष ते मीन 12 राशींसाठी वेगवेगळी रत्न परिधान करणं गरजेचं असते.
Heath Tips: सकाळचा चहा सोडा, हे 5 बेस्ट हेल्दी पर्याय ट्राय करा, वजन वाढ, शुगरचं टेन्शनच नाही!
advertisement
कोणत्या राशीला कोणतं रत्न?
मेष राशी: राशी चक्रातील पहिली रास मेष ही आहे. मेश राशीचा गुरु हा मंगळ आहे. त्यामुले या राशीचा लोकांनी पोवळा हे रत्न धारण करावे.
वृषभ राशी: राशी चक्रातील दुसरी राशी ही वृषभ आहे. वृषभ राशीचा ग्रह हा शुक्र आहे आणि शुक्र राशीच्या लोकांनी ओपेल किंवा डायमंड हे रत्न धारण करावे.
मिथुन राशी: ही रास राशी चक्रात तिसऱ्या स्थानी आहे. मिथुन राशीचा ग्रह बुध असून या राशीच्या लोकांनी पन्ना रत्न धारण करावे.
कर्क राशी: राशी चक्रात चौथ्या स्थानावर कर्क राशी आहे. हिचा ग्रह चंद्र असल्याने या राशीच्या लोकांनी मोती हे रत्न धारण करावे.
सिंह राशी: राशी चक्रात पाचवी रास ही सिंह आहे. या राशीचा ग्रह सूर्य असून या राशीच्या लोकांनी माणिक रत्न धारण करावे.
कन्या राशी: ही रास राशी चक्रात सहाव्या स्थानावर आहे. कन्या या राशीचा ग्रह बुध असून या लोकांनी देखील पन्ना हेच रत्न धारण करणे योग्य ठरते.
तूळ राशी: राशी चक्रात सातव्या स्थानी तूळ रास असून या राशीचा ग्रह शुक्र आहे. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी ओपेल हेच रत्न धारण करावे.
वृश्चिक राशी: राशी चक्रात आठव्या स्थानावर असणाऱ्या या राशीचा ग्रह मंगळ आहे. त्यामुळे या लोकांनी पोवळा रत्न धारण करावे.
धनु राशी: राशी चक्रात नवव्या स्थानावर ही रास आहे. या राशीचा ग्रह गुरू आहे. त्यामुळे या लोकांनी पुष्कराज हे रत्न धारण करावे.
मकर राशी: ही रास राशीचक्रात दहाव्या स्थानावर आहे. या राशीचा गुरु शनि आहे. शनी ग्रह तापट स्वरुपाचा असल्याने या राशीच्या लोकांना निलम हे रत्न परिधान करावे.
कुंभ राशी: राशी चक्रात अकराव्या स्थानावर कुंभ राशी आहे. या राशीचा ग्रह शनिच आहे. त्यामुळे या लोकांनी आपल्या आयुष्यात निलम रत्नच धारण करावे.
मीन राशी: राशी चक्रात शेवटच्या म्हणजेच बाराव्या स्थानावर मीन रास आहे. या राशीचा ग्रह गुरु असल्याने पुष्कराज हेच रत्न धारण करावे.
उपरत्न कोणती?
या रत्नांसोबतच काही उपरत्ने देखील असतात. तर काही क्रिस्टल देखील असतात. जसे की ग्रिन एववेंचुरियन हा रत्न बुध ग्रहाशी निगडीत आहे. नेपिझलाजुलीजा हा शनी ग्रहाशी निगडीत आहे. त्यातच रोझस्कॉड परिधान केले तर लग्नानंतरच्या सर्व गोष्टी सुखात होत असतात. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणात काही अडथळे येत असतील तर किंवा मन लागत नसले तर एव्हांचुरियन ब्रेसलेटचा वापर केल्यास त्या गोष्टी मार्गी लागतात, असे भावेश सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)