मुंबई : शनीचं नाव ऐकलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. कारण शनीला नेहमीच कठोर ग्रह मानलं जातं. मात्र वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि देव हे न्यायाचे देव आहेत. ते मनुष्याला त्याच्या कर्मानुसारच फळ देतात. त्यामुळे शनीच्या प्रभावाचा अर्थ नेहमी वाईटच असेल असं नाही. तरीदेखील, शनीच्या साडेसातीचा काळ हा आयुष्यातील एक आव्हानात्मक टप्पा मानला जातो. या काळात व्यक्तीला संघर्ष, अडथळे, आर्थिक ताणतणाव आणि मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं.
advertisement
२०३८ पर्यंत शनीच्या साडेसातीचा प्रभाव
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रह साडेसात वर्षे एका राशीमध्ये, तसेच तिच्या आधीच्या आणि नंतरच्या राशीत प्रवास करतो. या कालखंडालाच साडेसाती म्हटलं जातं. मार्च २०२५ मध्ये शनीने मीन राशीत प्रवेश केला असून त्यानंतरचा काळ काही राशींसाठी साडेसातीचा असेल.
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीवरील शनीची साडेसाती सध्या सुरू आहे आणि ती ३ जून पर्यंत चालेल.
मेष (Aries) : मार्च २०२५ पासून मेष राशीत साडेसाती सुरू झाली असून ती २०३२ पर्यंत कायम राहील.
वृषभ (Taurus) : वृषभ राशीवर शनीची साडेसाती २०२७ मध्ये सुरू होईल.
मिथुन (Gemini) : ८ ऑगस्ट २०२९ रोजी मिथुन राशीसाठी साडेसातीची सुरुवात होईल आणि ती ऑगस्ट २०३६ पर्यंत राहील.
कर्क (Cancer) : मे २०३२ पासून कर्क राशी साडेसातीच्या प्रभावाखाली येईल, जी २२ ऑक्टोबर २०३८ रोजी संपेल.
यामुळे २०२५ ते २०३८ या कालावधीत कुंभ, मीन, मेष, वृषभ आणि कर्क राशींच्या व्यक्तींवर शनिचा प्रभाव राहणार आहे.
साडेसाती संपणाऱ्या राशी कोणत्या?
मार्च २०२५ मध्ये शनीच्या मीन राशीत प्रवेशामुळे मकर राशीवरील साडेसाती समाप्त झाली आहे. त्याचबरोबर, कर्क आणि वृश्चिक राशींवरील शनीची ढैय्याही संपली आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
शनीची साडेसाती कमी करण्यासाठी उपाय
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या साडेसातीचा प्रभाव सौम्य करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत, शनिवारी शनी देवाची पूजा करून त्यांना प्रसन्न करा. दररोज हनुमान चालीसाचे पठण करा. जसे की, उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडाची अंगठी धारण करावी. शनिवारी शनीदेवांना तीळाच्या तेलाचा अभिषेक करावा. काळ्या मुंग्यांना मध आणि साखर खाऊ घातल्यानेही शनी प्रसन्न होतात.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)