ज्योतिषशास्त्रात शनीला दंडाधिकारी मानलं जातं. कारण शनी कर्मानुसार फळं देतो. शनी मंदगतीने राशिपरिवर्तन करतो. त्यामुळे या परिवर्तनाचा मोठा आणि दीर्घ काळ परिणाम होतो. 2023 मध्ये शनीने कुंभ राशीत प्रवेश केला. त्या वेळी कुंभ राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाला. 2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करील तेव्हा कुंभ राशीचा दुसरा टप्पा संपेल. साडेसाती सुरू असताना काही उपाय केल्यास निश्चित दिलासा मिळू शकतो.
advertisement
50 वर्षांनी शनी नक्षत्रात मंगळ! या राशींचा सुवर्णकाळ, आयुष्यात नवी उंची गाठणार
साडेसातीमध्ये शनी संबंधित व्यक्तींना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पीडा देतो. दुर्घटना घडू शकतात. पैशांची टंचाई, आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. साडेसातीत त्रास कमी व्हावा यासाठी रोज सकाळी भगवान शंकराला गंगाजलाने अभिषेक करावा. मंगळवार आणि शनिवारी श्री हनुमानाची पूजा करावी. हनुमान चालिसा पठण करावी. भगवान शंकर आणि श्री हनुमानाच्या भक्तांना शनी पीडा देत नाही.
दर शनिवारी शमीच्या वृक्षाला पाण्याने अर्घ्य द्यावं. संध्याकाळी शमी किंवा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिस्तोत्र पठण करावं. शनिवारी पूजा झाल्यावर काळे उडीद, काळे तीळ, चामड्याच्या चपला दान कराव्यात.
शनीची साडेसाती साडेसात वर्षं असते. साडेसातीत अडीच वर्षांचे तीन टप्पे असतात. सध्या कुंभ राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. 2025 मध्ये शनी मीन राशीत गोचर करील तेव्हा कुंभ राशीचा दुसरा टप्पा संपेल आणि तिसरा टप्पा सुरू होईल. 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत शनी मीन राशीत असेल. तोपर्यंत कुंभ राशीला साडेसाती असेल. त्यानंतर कुंभ रास साडेसातीतून मुक्त होईल.
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चांगली बाब म्हणजे ही शनीची रास आहे. त्यामुळे शनी महाराज या राशीला कमी त्रास देतात. ज्या व्यक्ती चांगलं कर्म करतात त्यांना ते शुभ फळं देतात. तसंच शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा कमी त्रासदायक असतो.
त्रास द्यायला कुणी कमी केलं नाही! या राशींचे आता उजळणार नशीब;शुक्र-बुध लाभस्थानी
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)