सध्या जुलै 2025 मधील ग्रह स्थितीनुसार शनी ग्रह मीन राशीत विराजमान आहे. या ग्रहस्थितीनुसार, कोणत्या राशींना साडेसातीचा कोणता टप्पा सुरू आहे आणि त्यापैकी सर्वात त्रासदायक टप्पा कोणावर आहे, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
शनि तुमच्या चंद्र राशीच्या 12 व्या घरातून भ्रमण करतो, तेव्हा हा साडेसातीचा पहिला टप्पा असतो. या टप्प्यात सहसा आर्थिक अडचणी, अनावश्यक खर्च, आरोग्याच्या किरकोळ समस्या, एकाकीपणाची भावना आणि काही प्रमाणात मानसिक तणाव येऊ शकतो. परदेश प्रवास किंवा दूरच्या ठिकाणी जाण्याची शक्यता असते. शनि सध्या मेष राशीच्या 12 व्या स्थानी (मीन राशीत) असल्यामुळे मेष राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे.
advertisement
शनी तुमच्या चंद्र राशीतूनच (जन्म राशीतून) भ्रमण करतो, तेव्हा हा साडेसातीचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात त्रासदायक टप्पा असतो.
या टप्प्यात व्यक्तीला सर्वाधिक मानसिक, शारीरिक आणि भावनिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्य समस्या, संबंधांमधील ताणतणाव, करिअरमध्ये अडचणी, निर्णय घेण्यास अडचण आणि आत्मविश्वास कमी होणे, असे अनुभव येऊ शकतात. शनिदेव व्यक्तीला कठोर वास्तवाची जाणीव करून देतात आणि जीवनाचे महत्त्वाचे धडे देतात. शनी सध्या मीन राशीतच असल्यामुळे मीन राशीवर साडेसातीचा दुसरा म्हणजे साडेसातीमधील सर्वात त्रासाचा टप्पा सुरू आहे.
ऑगस्टमध्ये पैशांचा ढीग लावणार 4 राशींचे लोक; बुध-शुक्र-सूर्याकडून तिहेरी धनवर्षा
शनि तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या घरातून भ्रमण करतो, तेव्हा हा साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा असतो. या टप्प्यात संकटांची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागते. तरीही आर्थिक व्यवहार, कुटुंबातील संबंध आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते. या टप्प्यात शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देतात आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार करतात. साडेसातीच्या काळात शिकलेले धडे या टप्प्यात अधिक स्पष्टपणे समजून येतात. शनी सध्या कुंभ राशीच्या दुसऱ्या स्थानी (मीन राशीत) असल्यामुळे कुंभ राशीवर साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)