शनीचे नक्षत्र परिवर्तन: काय आहे खास?
उद्या दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी शनी उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. जेव्हा कोणताही ग्रह स्वतःच्या नक्षत्रात असतो, तेव्हा तो अधिक बळकट होतो आणि शुभ फळे देण्यास बांधील असतो. या काळात लोकांच्या आयुष्यात शिस्त येईल आणि मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.
पुढील 4 महिने 'या' 3 राशींना होणार प्रचंड फायदा
advertisement
मिथुन
करिअरमध्ये मोठी झेप मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचे हे नक्षत्र परिवर्तन 'कर्म' स्थानात होणार आहे. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत किंवा प्रमोशनची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा सुवर्णकाळ आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण झाल्याने आर्थिक स्थिती भक्कम होईल.
कर्क
भाग्योदयाचा काळ कर्क राशीच्या भाग्याच्या स्थानी शनीचे हे संक्रमण होणार आहे. गेल्या काही काळापासून रखडलेली तुमची सर्व कामे आता गतीने पूर्ण होतील. नशिबाची पूर्ण साथ लाभल्याने तुम्ही ज्या कामात हात घालताल तिथे यश मिळेल. परदेश प्रवासाचे योग असून धार्मिक कार्यांत तुमची आवड वाढेल. समाजात तुमचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे.
मकर
आत्मविश्वास आणि धनलाभ मकर राशीसाठी शनी हा लग्नेश असून तो तुमच्या पराक्रम स्थानात गोचर करत आहे. तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल. धाडसी निर्णय घेतल्याने व्यवसायात मोठा फायदा होईल. भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हा 4 महिन्यांचा काळ अत्यंत नफा मिळवून देणारा ठरेल. जुन्या आजारांपासूनही तुम्हाला सुटका मिळू शकते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
