वर्धा: एखादा दिवस, एखादा महिना आपल्याला कसा जाईल? हा प्रश्न सर्वांच्या मनात असतो. त्यामुळे अनेकजण आपल्या राशीचं भविष्य पाहात असतात. आता 2024 या वर्षातील पहिला जानेवारी महिना संपून फेब्रुवारी सुरू होत आहे. हा महिना राशी चक्रातील दुसरी राशी असणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांना कसा जाईल? याबाबत वर्धा येथील ज्योतिष अभ्यासक तरुण शर्मा यांनी माहिती दिली आहे.
advertisement
आरोग्याची काळजी घ्यावी
फेब्रुवारी महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्तम फलदायी राहण्याची शक्यता आहे. राशी स्वामी शुक्र मंगळ सोबत महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या अष्टम भावात राहून स्वास्थ्य समस्यांना जन्म देऊ शकतो. अत्याधिक भोग विलासाची प्रवृत्ती ही तुम्हाला बऱ्याच समस्यांचे शिकार बनवू शकते. यामुळे धन हानी होण्याचे योग बनतील. दुसरीकडे, आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. कारण, इतर ग्रह तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनवतील. करिअरसाठी वेळ अनुकूल राहील परंतु, व्यापारात चढ-उतार दिसेल.
Tulsi Tips: तुळशीची पानं तोडताना विशेष मंत्राचा करावा जप; या गोष्टींची घ्यावी खबरदारी
करिअरसाठी मेहनत घ्यावी लागेल
वैवाहिक जीवनासाठी हा महिना ठीक असेल तर, प्रेम संबंधात थोड्या समस्या येऊ शकतात. करिअरच्या दृष्टीकोनाने हा महिना मेहनतीचा राहणार आहे. कारण, दशम भावात आपल्याच राशीचे शनी महाराज तुमच्याकडून अधिक मेहनत करवून घेतील. तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल तेव्हाच तुम्हाला यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
कौटुंबिक वातावरण चांगले
हा महिना कौटुंबिक दृष्ट्या अनुकूल राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे स्वास्थ्य ही अनुकूल राहील. परंतु, ही गोष्ट नक्की आहे की, तुम्ही आपल्या कामात अधिक व्यस्त राहाल. आर्थिक स्थितीला पाहिले असता, महिन्याच्या सुरवातीमध्ये राहू तुमच्या एकादश भावात आणि शनी दशम भावात राहतील. यामुळे आर्थिक रूपात तुम्ही उन्नत व्हाल. हा महिना स्वास्थ्य दृष्टिकोनाने ठीक-ठाक असेल. पंचम भावात केतू महाराजांची उपस्थिती आणि द्वादश भावात देव गुरु बृहस्पती विराजमान असणे स्वास्थ्य दृष्टिकोनाने चांगले नाही, असे शर्मा सांगतात.
Ram Mandir: पंतप्रधानांनी केलं हे पुण्याचं काम, विदर्भाच्या बहिणाबाईंची कविता ऐकली का? Video
कन्यापूजन करून आशीर्वाद घ्यावे
वृषभ राशीच्या मंडळींसाठी हा महिना कसा असेल हे आपण जाणून घेतलं आहे. फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला ज्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागेल त्यावर उपायही सांगितला आहे. शुक्रवारी कन्या पूजन करून कन्येला खीर खायला द्यावी आणि तिचे आशीर्वाद घ्यावे, असे ज्योतिषी अभ्यासक तरुण शर्मा यांनी सांगितले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)