अयोध्या : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी मंगळ ग्रह आपल्या मेष या राशीत विराजमान आहे. 12 जुलैपर्यंत मंगळ ग्रह तिथेच राहणार आहे. अशा परिस्थिती मंगळावर शनीची दृष्टि असणे ही बाब धोक्याची मानली जाते. याचा प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडतो. एखाद्या राशीवर सकारात्मक तर दुसऱ्या राशीवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे आता 5 राशींच्या लोकांना सावध होण्याची गरज आहे. या 5 राशी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊयात.
advertisement
अयोध्येतील ज्योतिष पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांना शनिच्या तिसऱ्या दृष्टीपासून सावध होण्याची गरज आहे.
कर्क राशी - कर्क राशीच्या लोकांना शनीच्या तिसऱ्या दृष्टीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात नुकसान होऊ शकते. आर्थिक नुकसान यासोबतच करिअरमध्येही चढ-उतार होतील. त्यामुळे अशा काळात धैर्य ठेवण्याची गरज आहे.
देशभर त्यांचे भक्त, मोठमोठे मंत्रीही दरबारात लावतात हजेरी! कोण आहेत पंडित प्रदीप मिश्रा?
कन्या राशी - या राशीच्या लोकांना जास्त मेहनत करण्याची गरज आहे आणि त्यांना कमी फळ मिळेल. अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागेल. विनाकारण खर्च होत असल्याने तणावात राहाल. त्यामुळे कमी बोलणे चांगले राहील.
तूळ राशी - तूळ राशीच्या जातकाला या वेळी संपत्ती संबंधित प्रकरणात सावधान राहावे लागेल. विवाहित लोकांना लग्नासाठी थांबावे लागेल. ही वेळ तूळ राशीच्या लोकांसाठी योग्य राहणार नाही.
वृश्चिक राशी - या राशीच्या जातकावर अनेक प्रकारची संकटे येतील. करिअरमध्ये निराशाजनक प्रस्ताव किंवा बातमी मिळू शकते. आपापसात वाद वाढू शकतात.
मकर राशी - मकर राशीच्या जातकासाठी ही वेळ योग्य नसेल. खर्च वाढू शकतात. आर्थिक समस्या जाणवू शकते. नातेसंबंधात वाद निर्माण होऊ शकतो.
नोट : इथे देण्यात आलेली माहिती ही ज्योतिष शास्त्राच्या आधारावर आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.