पहिल्या पत्नीने लावून दिलं पतीचं दुसरं लग्न, स्वत: घेतला पुढाकार; म्हणाली, आम्ही बहिणीसारखं राहू, काय आहे कारण?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
दामोदर पासवान दुसरे लग्न करण्यासाठी आला होता. लग्नात वरातीचे नेतृत्त्व त्याच्याच पहिल्या पत्नीने म्हणजे अनिता देवीने केले. तर त्याचे दुसरे लग्न हे चौपारण येथील नरेना गावातील सुमन देवीसोबत होत होते.
रुपांशी चौधरी, प्रतिनिधी
हजारीबाग : गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. तसेच विवाहबाह्य संबंधांच्याही अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
हजारीबाग येथील बरही परिसरातील अनुमंडल प्रांगणातील शिव मंदिरात एका पत्नीने आपल्या पत्नीचे दुसरे लग्न लावून दिले. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला आणि आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
advertisement
बरही येथील शिव मंदिरात बुधवारी जिल्ह्यातील केंदुआ 3 येथील रहिवासी असलेल्या दामोदर पासवान दुसरे लग्न करण्यासाठी आला होता. लग्नात वरातीचे नेतृत्त्व त्याच्याच पहिल्या पत्नीने म्हणजे अनिता देवीने केले. तर त्याचे दुसरे लग्न हे चौपारण येथील नरेना गावातील सुमन देवीसोबत होत होते. सुमन देवीच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. पहिल्या पतीपासून सुमनला दोन मुलेही आहेत. ही मुले आता त्यांच्या आजोबा आणि आजीसोबत राहणार आहेत.
advertisement
AC खरेदी करण्याआधी आणि नंतर, या गोष्टी माहिती असणे गरजेचं, महत्त्वाचा सल्ला!
तर दुसरीकडे दामोदर पासवानची पहिली पत्नी अनीता देवीने सांगितले की, लग्नानंतर त्यांना तीन मुले झाली. मात्र, एकही मुलगा झाला नाही. या कारणामुळे वंश पुढे चालावा म्हणून तिने आपल्या पत्नीचे दुसरे लग्न एका विधवा महिलेसोबत लावून दिले. कारण यामुळे त्यांना मुलगा होईल आणि त्यांचा वंश पुढे चालेल. या लग्नामुळे कुटुंबातील सर्व लोक आनंदी आहेत. आता आम्ही दोन्ही पत्नी अगदी बहिणीसारखं एकाच घरात राहू, असेही तिने सांगितले.
advertisement
दोघांना सारखे प्रेम करेन -
तर दामोदर पासवान याने सांगितले की, त्यांच्या पहिल्या लग्नाला आता 15 वर्षे झाली आहेत. मात्र, एकही मुलगा झाला नाही. यामुळे समाजातील अनेकांचे टोमणे ऐकावे लागले. पत्नी आणि सासरच्या लोकांनी एक मुलगी शोधली. त्या मुलीसोबत मी लग्न करत आहेत. पुढे मी भविष्यात दोन्ही पत्नींना सारखे प्रेम करेन. दोन्ही सोबत बहिणींसारखे एकाच घरात राहतील. घरातील वाद आम्ही घरातच सोडवू, असेही त्याने सांगितले. दरम्यान, या नवीन लग्नामुळे नववधूही आनंदी आहे.
Location :
Hazaribagh,Jharkhand
First Published :
June 27, 2024 5:10 PM IST
मराठी बातम्या/Viral/
पहिल्या पत्नीने लावून दिलं पतीचं दुसरं लग्न, स्वत: घेतला पुढाकार; म्हणाली, आम्ही बहिणीसारखं राहू, काय आहे कारण?