गणरायाची स्थापना विधी -
वास्तुशास्त्रात कोणत्याही पूजेविषयी अनेक नियम तपशीलवार सांगितले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण पूजनामध्ये वास्तू नियमांचे पालन केले पाहिजे. गणेशाची मूर्ती स्थापन करण्यासाठी पाठ किंवा चौरंग घ्यावा. घरात ईशान्य दिशेला मूर्ती स्थापन करण्यासाठी जागा निवडा. येथे पाट किंवा चौरंग मांडून गणपतीची मूर्ती स्थापित करावी. चौरंगा भोवतीचा फुले, केळीची पाने इत्यादींनी आकर्षक सजावट करावी. अशा प्रकारे घरात गणपतीची मूर्ती स्थापित केल्याने तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते.
advertisement
दरवाजाशी संबंधित वास्तू नियम - गणेश चतुर्थीच्या काळात घराचा दरवाजा आकर्षक सजवणं खूप शुभ मानलं जातं. दरवाजातून श्री गणेश आपल्या घरात प्रवेश करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. यासोबतच, दरवाजावर स्वस्तिक चिन्ह देखील काढावे. दारात रांगोळी काढणे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते, शिवाय श्री गणेशजी जीवनातील अडचणी दूर करतात.
देवाच्या परिक्रमांचा नियम चुकवू नका! विधीपूर्वक पूजेसाठी या गोष्टी ध्यानात ठेवा
रंगांची विशेष काळजी घ्या - गणेश चतुर्थीनिमित्त घराची सजावट करताना, रंगांचा वापर खूप काळजीपूर्वक केला पाहिजे. पूजनाशी संबंधित कोणत्याही गोष्टींमध्ये चुकूनही काळा, तपकिरी, गडद निळा रंग वापरणे टाळावे. वास्तुनुसार गणेश चतुर्थीसारख्या धार्मिक प्रसंगी लाल, गुलाबी, पिवळा आणि हिरवा रंग वापरावा. या रंगांचा वापर केल्याने घरात सकारात्मकता राहते आणि आपल्याला देवाचे आशीर्वाद देखील मिळतात.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)