TRENDING:

6 एप्रिल ठरणार 4 राशींसाठी खास, सिंगल्स अँड मिंगल्सच्या लव्ह लाइफमध्ये येणार ट्विस्ट; आयुष्यात होणार 'स्पेशल' एन्ट्री

Last Updated:

जेव्हा शुक्र एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी स्वभाव आणि विशेषतः 'लव लाईफ'वर होतो. शुक्राचे हे परिवर्तन कोणत्या राशींसाठी सुखद ठरणार आहे जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Love Horoscope : ज्योतिषशास्त्रामध्ये प्रेम, रोमान्स, सौंदर्य आणि विलासी जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह 6 एप्रिल 2026 रोजी आपले नक्षत्र बदलणार आहे. शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. जेव्हा शुक्र एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी स्वभाव आणि विशेषतः 'लव लाईफ'वर होतो. शुक्राचे हे परिवर्तन कोणत्या राशींसाठी सुखद ठरणार आहे जाणून घेऊ.
News18
News18
advertisement

मेष

शुक्र सध्या तुमच्या स्वराशीत आहे आणि त्याचा स्वनक्षत्रातील प्रवेश तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. या राशीत जन्मलेले अविवाहित लोक नवीन लोकांशी संबंध जोडू शकतात, तर योग्य लाईफ पार्टनरच्या शोधात असलेल्यांनाही योग्य जोडीदार मिळू शकतो. या राशीत जन्मलेल्यांच्या जीवनात प्रेमाचे क्षण भरपूर येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ अनुकूल असेल.

advertisement

तूळ

शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि त्याचे स्वगृही भ्रमण तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. तुमच्या जोडीदारासोबतचे कोणतेही मतभेद मिटण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरावर तुमची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. लव्ह कपल आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी भेटवस्तू खरेदी करू शकतात. तुमच्या जीवनात स्नेह आणि प्रणय वाढेल.

advertisement

धनु

शुक्र तुमच्या प्रेम स्थानात आपले स्थान बदलेल. या स्थानबदलामुळे एखाद्या अनोळखी व्यक्तींसह भेट होऊ शकते आणि या भेटीतून प्रेमसंबंधही निर्माण होऊ शकतात. विवाहित व्यक्तींना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळू शकतो, म्हणजेच त्यांच्या आयुष्यात एका नवीन पाहुण्याच्या आगमनाची शक्यता आहे. शुक्राचे हे संक्रमण तुम्हाला शिक्षण क्षेत्रातही यश मिळवून देऊ शकते.

मकर

advertisement

शुक्र ग्रहाच्या नक्षत्रातील बदलामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद येईल. या काळात, काही जण आपल्या कुटुंबीयांच्या संमतीने विवाहबंधनात अडकू शकतात. प्रेमसंबंधही बहरतील आणि या राशीचे काही लोक आपल्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवू शकतात. शुक्र ग्रहाच्या नक्षत्रातील बदलामुळे, या राशीचे काही लोक भौतिक वस्तू खरेदी करू शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रँडला ठार मारण्याआधी चाफेकर बंधूंनी इथं घेतली होती शपथ, ब्रिटिशांनी हीच 'ती' मूर्ती केली जप्त, Video
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
6 एप्रिल ठरणार 4 राशींसाठी खास, सिंगल्स अँड मिंगल्सच्या लव्ह लाइफमध्ये येणार ट्विस्ट; आयुष्यात होणार 'स्पेशल' एन्ट्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल