नीलम रत्न 'या' राशींसाठी आहे वरदान
वृषभ रास : वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र व शनि हे नैसर्गिक मित्र आहेत. वृषभ राशीच्या लोकांसाठी नीलम रत्न भाग्यवर्धक ठरतो. करिअरमध्ये मोठी प्रगती, धनलाभ आणि समाजात मान-सन्मान मिळतो.
मिथुन रास : मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि बुध-शनिमध्ये मैत्रीचे संबंध आहेत. मिथुन राशीच्या लोकांनी नीलम धारण केल्यास त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात स्थिरता येते. आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते.
advertisement
कन्या रास : कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांसाठी नीलम रत्न धन-समृद्धी आणि उत्पन्न वाढवणारा सिद्ध होतो. शिक्षण आणि बौद्धिक कार्यांमध्ये यश मिळते.
तूळ रास : तूळ राशीचा स्वामी शुक्र असून, ही शनीची उच्च रास मानली जाते. तूळ राशीसाठी नीलम रत्न राजयोग निर्माण करतो. धारण करताच नशीब चमकते, प्रत्येक कामात यश आणि ऐश्वर्य प्राप्त होते.
मकर रास : मकर राशीचा स्वामी स्वतः शनि आहे. त्यामुळे मकर राशीच्या लोकांसाठी नीलम रत्न अत्यंत शुभ आणि शक्तिशाली असतो. त्यांना करिअरमध्ये यश आणि कामात स्थिरता मिळते.
कुंभ रास : कुंभ राशीचा स्वामी देखील शनि आहे. या राशीच्या लोकांसाठी नीलम धारण करणे सर्वोत्तम ठरते. नीलम धारण केल्यास त्यांना शारीरिक आणि मानसिक बळ मिळते, तसेच आर्थिक समस्या दूर होतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
