मेष (Aries)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींनी विनाकारण अडचणीत न पडता आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं. इतरांशी बोलताना भान ठेवावं. मुत्सद्देगिरीचा वापर करा आणि तुमच्या कामात सावधगिरी बाळगा. नात्याची खूप काळजी घ्यावी लागेल. कोणतीही कौटुंबिक समस्या सोडवताना किंवा आपले विचार मांडताना कोणाच्याही प्रतिष्ठेला ठेच लागणार नाही किंवा कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. या आठवड्यात नातेवाईकांकडून कमी सहकार्य मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल काळजी कराल. अज्ञात धोक्याची भीती वाटू शकते. न्यायालयीन प्रकरणांबाबत तुम्हाला अधिक धावपळ करावी लागू शकते. विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकतं. प्रेमसंबंधात सावधगिरीने पुढे जा. जोडीदाराच्या आरोग्याबाबत आणि अनावश्यक गोष्टींवरील खर्चामुळे तुम्ही काळजीत असाल.
advertisement
Lucky Color : Pink
Lucky Number : 7
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आणि लाभदायक असेल. एखाद्या चांगल्या बातमीने आठवड्याची सुरुवात होईल. करिअर आणि व्यवसायाच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी आनंददायी वातावरण असेल. वरिष्ठ आणि कनिष्ठ तुम्हाला पूर्ण पाठबळ देतील. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलात, तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल, तिच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा यशस्वी आणि लाभदायक ठरेल. आठवड्याच्या मध्यात धार्मिक-शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाची योजना अचानक बनू शकते. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवता येईल. तुम्ही अविवाहित असाल तर मैत्रीचं प्रेमात रूपांतर होऊ शकतं. आरोग्य सर्वसाधारण राहील.
Lucky Color : Cream
Lucky Number : 14
सावधान! मकर संक्रातीनंतर या राशींची महिनाभर भंबेरी उडणार, निर्णयात चुकू नका
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या व्यक्तींच्या करिअरसाठी हा आठवडा खूप शुभ असेल; पण नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून काळ थोडा प्रतिकूल असू शकतो. गरज असताना जवळच्या व्यक्तींची मदत होणार नाहीत. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. या आठवड्यात, तुम्हाला वरिष्ठ किंवा कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही; पण तुम्ही स्वतःहून चांगली कामगिरी कराल. या आठवड्यात तुम्हाला आयुष्यात खूप छान गोष्टी शिकायला मिळतील. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्यात दडलेली ऊर्जा आणि क्षमता ओळखायला शिकाल आणि त्यांचा चांगला वापर कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. फायद्याऐवजी आर्थिक नुकसान होऊ शकतं. आयुष्यातील कोणत्याही आव्हानात्मक काळात तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा असेल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन बनू शकतो.
Lucky Color : Green
Lucky Number : 2
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आणि लाभदायक असेल. या आठवड्यात तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्हाला नफाही मिळेल; पण उत्साहामुळे संवेदना गमावू नका. नाही तर नफ्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. या आठवड्यात तुम्ही कष्ट कराल आणि त्याचे परिणाम दिसतील. दिनचर्या आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नाही तर शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. अशा समस्या टाळण्यासाठी, आपला वेळ आणि ऊर्जा यांचं व्यवस्थापन करा. जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असलात, तर तुमचं स्वप्न या आठवड्यात पूर्ण होईल. या संदर्भात केलेला प्रवास आनंददायी आणि अपेक्षित लाभ देणारा ठरेल. जमीन आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला त्यातून लक्षणीय नफा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात चैनीच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो. एखादी आवडती गोष्ट मिळाल्याने किंवा कुटुंबातल्या एखाद्या सदस्याच्या मोठ्या यशामुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
Lucky Color : Grey
Lucky Number : 5
मन तिकडं ओढतंय! पण ती वाट सगळं उद्ध्वस्त करेल, या राशींना मोठा अलर्ट
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
